
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनीधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर शहरात दरवर्षीप्रमाणे विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. नालंदा बुद्ध विहारात झालेल्या या बैठकीत राज्याचे माजी क्रीडा मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी देविदास कांबळे यांची निवड झाली.
बैठकीस माजी पोलीस निरीक्षक दिलीप कांबळे, माजी नगरसेवक श्रीरंग कांबळे, नरसिंग शिंदे, ॲड. प्रफुल्लकुमार उदगीरकर, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह समाजबांधव आणि विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.