
या तारखेपासून लागू होणार 8 वा वेतन आयोग…
दिल्ली : लवकरच आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या वेतन रचनेत महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली असून केंद्र सरकारने अर्थमंत्री, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालयसह प्रमुख भागधारकांकडून संदर्भ अटींवर सूचना मागवल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. तर त्याची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार? यासंदर्भात सर्व कर्मचारी आतुर होते. त्यानंतर आता याबद्दलची तारीख समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरनुसार पगारात वाढ होणार आहे. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा झाल्यापासून देशातील लाखो सरकारी कर्मचारी त्याच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. याआधी असे समोर आले होते की, केंद्र सरकार 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करू शकते. पण आता याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत काही तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करणे खूप कठीण आहे. याचा अर्थ त्याच्या अंमलबजावणीत काही विलंब होऊ शकतो. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात की, आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारकडे पुरेसा वेळ आहे. कारण तो एक वर्षापूर्वीच जाहीर झाला आहे. पण हे लक्षात घेण्यासारखे आहे की सरकारने अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटी जाहीर केलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत, आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 रोजी लागू होईल की नाही याबद्दल संभ्रम आहे.