
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / गोदावरी नदीमध्ये बुडालेल्या मित्राला वाचविणा-या वैभव खाडे याचा नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.रहाटी बु. ता.नांदेड येथे दि.२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पंचमुखी महादेव मंदिर रहाटी बू.येथील गोदावरी घाटावर सोहम विनोद हाटकर वय तेरा हा सातव्या वर्गातील मुलाचा पाय घसरल्याने गोदावरी पात्रात बुडत होता. यावेळी समय सूचकता दाखवत त्याच्याच वर्गातील वैभव बालाजी खाडे या मुलाने धावत जाऊन सोहम हाटकर या विध्यारथ्यांचा प्राण वाचवला याबद्दल आमदार बालाजी कल्याणकर यांनी कौतुक करून वैभव खाडे व त्याचे वडील बालाजी खाडे यांचा सत्कार केला .त्याची बालशौर्य पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना बालाजी कल्याणकर यांनी वैभव खाडेचे कौतुक तर केलेच शिवाय त्याला बाल शौर्य राष्ट्रपती पुरस्कार देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस
पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांना पत्र देऊन या विषयाला प्राधान्य क्रमांकाने हाताळून पत्र
माननीय मुख्यमंत्र्याकडे पाठवण्यासाठी सांगितले. या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायणराव बोकारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहटी बु. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.