
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम रिसोड -भागवत घुगे
हि़गोली /रिसोड येथील
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात सोमवारी हळदीला कमीत कमी १० हजार ते जास्तीत जास्त १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. रिसोड बाजासमिती गुरुवारी गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ५ हजार रुपये कमी दराने हळदीला दर मिळत आहे. एकीकडे उत्पादनात घट झाली आहे तर दुसरीकडे हळदीला दरही कमी भेटत असल्याने हळद उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. हळदीसाठी लागवड खर्च मोठा असल्याने त्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
सांगलीनंतर हिंगोली व वसमत येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात हळदीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. येथील मॉड्यात मराठवाड्यासह विदर्भातून हळद विक्रीसाठी येते. गतवर्षी हळदीला १८ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला होता. यंदा मात्र हा दर
हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात सोमवारी हळदीची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती.
हळद उत्पादकांना दुहेरी फटका
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हळदीला कंदकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तसेच शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात करपा रोगही पडला. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात ३० टक्क्याने घट झाली आहे. एकीकडे हळदीचे उत्पादन घटले असताना दुसरीकडे दरातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. हळदीसाठी लागवड खर्च अधिक लागतो. तसेच मजूरीही मोठ्या प्रमाणात लागत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिएकर ८० ते ८५ हजार रूपये खर्च येत आहे. उत्पादन मात्र प्रतिएकर २० क्विंटलपर्यंतच येत असल्याने यंदा हळद शेतकऱ्यांसाठी रूसल्याचे चित्र आहे.
प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांच्या आसपास मिळत आहे. येथील मोंढ्यात मागील पंधरवड्यापासून नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. सोमवारी जवळपास ३ हजार पोती हळदीची आवक झाली. नवीन हळदीला सरासरी ११ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला तर जुन्या हळदीला १२ हजारांच्या आसपास दर मिळाला. अजूनही येथील मोंढ्यात म्हणावी तशी हळदीची आवक सुरू झालेली नाही. सध्या एकाच दिवशी मालाचा लिलाव होऊन मालाचे वजन केले जात आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हळदीची आवक वाढणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. सध्यातरी हळदीला १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. हा दर किमान १५ हजार रुपये मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.