
दैनिक चालु वार्ता माळशिरस प्रतिनिधी-राजेंद्र पिसे
नातेपुते : जि. प. प्राथमिक शाळा, काळेमळा(फोंडशिरस) ता. माळशिरस शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तब्बल ३२ कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये विविध गाणी व नाटक सादर केले.याप्रसंगी आमच्या पप्पांनी गणपती आणला,पाव्हंण जेवला का,देव धनगर वाड्यांत घूसला,आम्ही शिवकन्या,आपलीच हवा,माय मराठी,पिचली माझी बांगडी, शेतकरी नाटक अशा प्रकारे विद्यार्थानी डान्सव्दारे मनोरंजन व समाज प्रबोधनही केले.
यावेळी लोकसभागातून ५० हजार रुपयांची देणगी शाळेला प्राप्त झाली.या कार्यक्रमास फोंडशिरसचे सरपंच पोपटराव बोराटे, संतोष महामूनी,केंद्रप्रमूख कांतीलाल पोतलकर,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष काळे,उपाध्यक्ष श्रीकांत वाघमोडे,ग्रामसेवक,सूनील बोराटे, मूख्याध्यापक संजय शेंडे, निलेश बनसोडे, पालक,यूवक, ग्रामस्थ मोठ्या सख्येंने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जून पिसे यांनी केले