
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
पैठण : श्री संत एकनाथ महाराज नाथ षष्ठी सोहळ्यानिमित्त पाचोड येथील सरपंच शिवराज भुमरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या युवक दिंडीचे मराठी पत्रकार संघ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पैठण तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन आवारे यांनी (ता. 21) शुक्रवारी शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. युवक दिंडीचे पाचवे वर्ष असून पाचोड ते पैठण वाजत-गाजत भक्तीमय वातावरणात दिंडीचे आयोजन करण्यात येते. यावेळी दै. दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी रमेश शेळके, लोकमतचे दादासाहेब गलांडे, पत्रकार तुषार नाटकर सह आदीं उपस्थित होते.