दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
नुकतेच महाराष्ट्र स्टेट बैंक मित्र असोसिएशन च्या सर्व जिल्हा प्रतिनिधींची एक सभा दि. १६ मार्च रोजी पुणे येथे झाली. या सभेत इतर अनेक प्रश्नांबरोबर २४ आणि २५ मार्चच्या बैंक कर्मचा-यांच्या संपावर चर्चा करण्यात आली आणि सर्वानुमते या संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी सर्व शहरातून बैंक मित्र बैंक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात सहभागी होतील आणि आपला पाठिंबा जाहीर करतील. बँकेतर्फे सध्या आयबीपीएस (IBPS) मार्फत भरती करण्यात येते, पण त्यांचे रूजू होण्याचे प्रमाण,खूपच कमी आहे हे लक्षात घेता बँकांनी भरती करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जमातील काही जागा बैंक मित्रांसाठी आरक्षित ठेवाव्यात आणि त्यांची गुणवत्ता पाहून त्यांना या आरक्षित जागेवर नेमण्यात यावे अशी संघटनेतर्फे मागणी करण्यात येत आहे.