
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर)
तालुक्यातील सताळा येथे जय हनुमान ज्ञान प्रसारक मंडळ मोघा द्वारा संचलित शिवाजी विद्यालयांमध्ये गुरुगौरव सोहळा व माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन या विद्यालयातील 1996 1997 व 1998 साली इयत्ता दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी केले होते. सविस्तर वृत्त असे की सताळा येथील शिवाजी विद्यालयात 1996, 97 व 98 च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांना घडविलेल्या इयत्ता पहिली ते दहावी म्हणजेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सताळा येथील वर्ग पहिली ते सातवी आणि शिवाजी विद्यालयात वर्ग आठवी ते दहावी मध्ये शिकवलेल्या सर्व गुरुजनांचा गुरु गौरव सोहळा व सताळा, गुंजोटी, सायगाव, व्हटी आणि दळवेवाडी या गावातील सर्व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद कुलकर्णी होते तर विशेष उपस्थिती म्हणून जय हनुमान ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव पुंडलिकराव कदम व सताळा ग्रामपंचायतीचे सरपंच तथा माजी विद्यार्थी लक्ष्मण खंदाडे हे होते. कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून जी आर जगताप, पि के कोंपले, के टी जाधव, एस व्ही चांदीवाले, एम जी चाटे, डी एच वाकडे, आर एस कराड, आर आर मद्देवाड ,गणपत महाळंकर ,प्रभाकर बेद्रे, एकनाथ कराड, अनिरुद्ध मलवाड, विठ्ठल कदम, गोविंद कोलपूसे,राजकुमार बडगिरे, रघुनाथ वाघमारे, बाबुराव पलाने व आप्पाराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात 23 मार्च हा शहीद दिन असल्याने भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली . त्यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. या स्नेह मेळाव्यात तीस वर्षानंतर पहिल्यांदाच रविवारी शिवाजी विद्यालयात शाळेची घंटा वाजली तीही एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वाजवली, सर्व माजी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले, त्यानंतर सर्व जुन्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत, प्रतिज्ञा ,परिपाठ घेण्यात आला. परिपाठानंतर तिन्ही बॅचचे विद्यार्थी आपापल्या वर्गात जाऊन बसले. त्यांची हजेरी घेण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांनी आपण सध्या काय करतोय , आपले कुटुंब, आपला व्यवसाय याविषयीचा परिचय करून दिला.दुसऱ्या सत्रामध्ये गुरुजनांचा गुरु गौरव सोहळा संपन्न झाला यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी व सत्कारमूर्तींनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाबासाहेब वाघमारे यांनी केले तर आभार सचिन महाळंकर यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम घेतले व हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पाडला.