
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):- तालुक्यातील मुख्य ग्रामीण भागातील नांदेड ते लातूर हायवे लगत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 24 मार्च 2025 रोजी सदिच्छा भेट दिली यावेळी शिक्षण विभागाचे तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमान बबनरावजी ढोकळे यांनी प्रथम वेळी शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तर यासोबत पंचायत समितीचे नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी श्री माने साहेब यांनीही उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले तर प्रथम वेळी शाळेतील विविध विषयावर प्राथमिक स्वरूपात चर्चा करून. उन्हाळा असल्याने शाळेची वेळ तसेच शाळेअंतर्गत असणाऱ्या सोयी सुविधा व प्रत्यक्ष मुलांसमवेत चर्चा करून गुणवत्ता पडताळणी करून चर्चा केली आहे यावेळी शिक्षकांकडून प्रत्यक्ष चर्चा केल्याचा आनंद व्यक्त केला आहे यानंतर प्रशासकीय बाबीवर चर्चा करत असताना मार्च एंडिंग ला खर्ची करणे कामी अनुदानाची पडताळणी व चर्चा केली त्यानंतर इतर विषयावर संभाषण केले आहे व काही विषयाच्या अनुषंगाने त्रुटी व उपायोजना कशा लवकर आणि वेळेत पुर्ण करता येईल याबद्दल सविस्तर चर्चातून मार्ग निघेल असं बोलताना मनोगत व्यक्त केले होते.
तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी केली. यावेळी माननीय गट विकास अधिकारी माने साहेब गटशिक्षणाधिकारी श्री ढोकाडे साहेब केंद्रप्रमुख श्री कासार सर केंद्रीय मुख्याध्यापक श्री मुंडकर सर तर शाळेतील सर्व शिक्षक वृंद दरम्यान वेळी उपस्थित इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..