
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- कंधार तालुक्यातील शिराढोण येथील शेतकरी श्री.रमेश किशनराव शिंदे यांचा दि.२५ /२/२०२५ रोजी रानडुकराच्या हल्ल्यात मृत झाले होते. श्री.रमेश शिंदे यांच्या कुटुंबीयांना लोहा – कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्यामुळे वनविभाग शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई म्हणुन २५ लक्ष रुपयेचा धनादेश रोजी स्वागत लॉन्स, नांदेड जि.नांदेड येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार , राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री संजय बनसोडे, तसेच लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते मयत यांच्या पत्नी श्रीमती इंदुबाई शिंदे यांना १० लक्ष रुपयांचा नगदि धनादेश व १५ लक्ष रुपये त्यांच्या नावे बँकेमध्ये मुदत ठेवी करिता धनादेश असा २५ लक्ष रुपयांचे धनादेश देण्यात आले. तसेच
श्री.बापुराव किसन पवार हे रानडुक्कराच्या हल्ल्यात जखमी झाले होते, त्यांना नुकसान भरपाई म्हणुन ३९ हजार ६५७ रुपयाचा धनादेश या ठिकाणी देण्यात आला.
सदरील सदर मयताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मदत मिळण्यासाठी केशव वाभळे,(भा.व.से.), उपवनसंरक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली खाली श्री.भीमसिंग ठाकूर सहाय्यक वनसंरक्षक नांदेड, संदीप शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्र.) नांदेड, डि. एन. हकदळे वनपाल लोहा, नामदेव पंढरे वनरक्षक शिराढोण यांनी नुकसान भरपाई मिळण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला आहे.
यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार राजू नवघरे, आमदार राजेश विटेकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे माजी आमदार अविनाश राव घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष जीवनराव घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस वसंतराव सुगावे, मुक्तेश्वर धोंडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य पाटील बोरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर, साईनाथ पाटील कपाळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.