
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक -अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आष्टी :– येथील युवा कार्यकर्ता पंकज रमेशराव इंगळे यांचे सामाजिक-राजकिय क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेवून खासदार ऍड. भाई चंद्रशेखर आजाद यांचे नेतृत्वात आजाद समाज पार्टी महाराष्ट्र वर्धा युवा जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.आजाद समाज पार्टीच्या समतेच्या रथाचे सारथी राजे छत्रपति शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मान्यवर
साहब कांशिराम यांच्या विचारधारेवर आधारित कार्य समाजातील शेवट्च्या घटकापर्यंत न्यायिक भुमिकेत पोहचवन्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणांना बांधिल राहून पक्षाच्या वृध्दीसाठी कार्यरत असावे व पक्षाच्या विकास व संघर्षाच्या छबीचा सतत वाढता आलेख दिसेल अशी अपेक्षा ठेवत पंकज इंगळे यांचेवर नविन जबाबदारीसह वर्धा युवा जिल्हाध्यक्ष पदी पंकज इंगळे यांची निवड करण्यात आली आहे असे नियुक्ती पत्र युवा प्रदेशाध्यक्ष आजाद समाज पार्टी महाराष्ट्र अमोल लहाणू आहेर यांच्या स्वाक्षरीनिशी पत्र प्राप्त झाले आहे त्याच्या प्रतिलिपी
वैभव चाबूकस्वार, युवा प्रदेश प्रभारी, महाराष्ट्र संदीप मोरे, प्रदेश मुख्य महासचिव (युवा) आजाद समाज पार्टी, महाराष्ट्र यांना कळविले आहे त्यानुसार पंकज इंगळे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे