
देगलूर/प्रतिनिधी
अनुप कोडगीरे व डॉ.पूजा गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय उद्योजकते बद्दल ‘महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नाशिक येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे दोन्ही उद्योजकांच्या कार्याची दखल राज्यभरात घेतली जात आहे.
या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात डॉ. गायकवाड आणि अनुप कोडगीरे यांच्या कार्याची प्रशंसा केली. डॉ. गायकवाड यांनी आरोग्यसेवा आणि महिला सशक्तीकरणासाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. तसेच अनुप कोडगीरे यांनी आपल्या उद्योगातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. अनुप कोडगिरे हे एक देगलूर शहरातील नामांकित उद्योजक असून तसेच त्यांनी देगलूर शहरांमध्ये वेळोवेळी सामाजिक कार्यामध्ये पण अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यांच्या या पुरस्कारामुळे देगलूर शहर व परिसरातील सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.पुरस्कार स्वीकारल्यानंतर दोन्ही उद्योजकांनी आयोजक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आणि भविष्यात समाजाच्या विकासासाठी अधिक भरीव कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. या गौरवामुळे स्थानिक स्तरावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.