
बुलडोझर कारवाईला ब्रेक…
उपराजधानी नागपूर शहरात दोन गटात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे. तर या प्रकरणाचा तपास जस-जसा पुढे जात असताना अनेक दंगेखोरांची नावे पुढे येत असून नागपूर पोलीस सक्त कारवाई करत आहे
अशातच या प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी भाजपचे प्रदेश प्रवक्ता अजय पाठक यांना धमकी आल्याचा प्रकार समोर आला आहे. पाठक यांना विदेशातून धमकीचे फोन येत असून या संदर्भात त्यांनी नागपूर पोलिसांना माहिती देत रितसर तक्रार दाखल केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हे फोन सीरियातून असल्याचा अजय पाठक यांना संशय आहे.तर नागपूर दंगलीबद्दल टीव्हीवर मत व्यक्त केल्यामुळे ही धमकी देण्यात आल्याचेही सांगितलं जातंय. भविष्यत विरोधात भूमिका घेतली तर बघून घेण्याची भाषा या धमकीत वापरण्यात आली आहे. या धमकीप्रकरणाने नागपूरच्या राजकीय वातावरणासह सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून ही धमकीचे गांभीर्य लक्षात घेता ही धमकी नेमकी कोणी आणि त्यामागे कोण? याचा शोध पोलीस घेत आहे.
‘….इसलिये तुम्हारे साथ जो होगा वह ठीक नही होगा’
टीव्ही डीबेटवर नागपूर दंगलीबाबत पक्षाची बाजू मांडल्याने भाजप प्रवक्ते यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजय पाठक यांना सिरियावरून ही जीवे मारण्याची धमकी आली असल्याचे सांगितलं जातंय. दरम्यान या विषयी अजय पाठक यांच्याकडून नागपूरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. माझ्या जीवाला धोका असल्यामुळे सुरक्षा पुरवण्याची मागणी त्यांनी पोलिसांना केलीय. अजय पाठक नागपुरात घडलेल्या दंगलीवर प्रसारमाध्यमांकडे पक्षाची बाजू मांडत होते. दंगलीबाबत त्यांनी एका विशिष्ट गटावर आक्षेप घेतला. त्यामुळे त्यांच्या भ्रमणध्वनीवर 97 या कोड क्रमांकावरून एक फोन आला त्यात म्हटले आहे की, ‘जो तूम कर रहे हो, वह ठीक नही हैं, इसलिये तुम्हारे साथ जो होगा वह ठीक नही होगा’, अशी धमकी त्यात देण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रार अर्जाची नोंद घेतली आणि पुढील तपासासाठी तो अर्ज सायबर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला आहे.
महापालिकेची नोटीस, बुलडोझर कारवाईला ब्रेक, दंगलीमधील आरोप सुडाच्या हेतूनं
दुसरीकडे, न्यायालयाच्या स्थगितीमुळे नागपूर दंगलीतील आणखी चार आरोपीच्या बुलडोजर चालणे तूर्तता लांबणीवर गेले आहे. दंगलीत सहभागी असलेल्या एकूण सहा आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची नागपूर महानगरपालिकेची तयारी होती. मात्र फहीम खान व हाफिज नसीम शेख यांच्या घरावर कारवाई सुरु असतांना न्यायालयाचा आदेश आल्याने हि कारवाई लांबणीवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फहीम खान व हाफिज नसीम शेख यांच्या घरावर कारवाई केली असताना त्यापैकी तिसरा आरोपी शेख नाझिम याचे घराचे बांधकाम अवैध असल्यामुळे त्याच्या नातेवाईकांना महापालिकेने नोटीस देखील मिळाली आहे. मात्र शेख नाझीम आरोपीच्या आईने नोटीसला काल उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत नोटीसला अंतरिम स्थगिती दिली आहे. महापालिकेची नोटीस दंगलीमधील आरोप झाल्यावर सुडाच्या हेतूने पाठवण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला