
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
(अहमदपूर तालुक्यातील शहरी विभागातून प्रवेशास पात्र ठरणारी एकमेव विद्यार्थी)
====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य शहरातील नांदेड ते लातूर रोड लगत असलेल्या विद्यावर्धिनी विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी श्रुती कागणे ही इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयास पात्र ठरली. त्याबद्द संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील सर, सचिव तथा मुख्याध्यापिका सुषमा पाटील मॅडम यांच्या हस्ते तिचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत नवोदय विद्यालय समिती ही ग्रामीण भागातील गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय असून, अशा विद्यालयात इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी दरवर्षी परीक्षा घेण्यात येते. यावर्षीच्या सन 2025-26 च्या शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रुती कागणे ही शहरी विभागातून अहमदपूर तालुक्यातून जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरणारी एकमेव विद्यार्थी ठरली. गेल्या चार वर्षापासून सतत विद्यालयाचे विद्यार्थी शहरी भागातून नवोदय विद्यालय लातूर येथे पात्र ठरत असून, याही वर्षी विद्यालयाने ही यशाची परंपरा कायम राखली आहे. यावेळी पात्र ठरलेल्या विध्यार्थीनीचा सत्कार करताना संस्थेच्या अध्यक्ष शिवाजीराव पाटील सर, सचिव तथा मुख्याध्यापिका सुषमा पाटील मॅडम व तिचे मार्गदर्शक शिक्षक उमाकांत श्रीमंगले सर यांची उपस्थिती होती. प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी, तसेच विविध समाज माध्यमातून व वेगवेगळ्या स्थरावरून तिचे अभिनंदन केले जात आहे.