
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : येरवडा ते वडगाव शेरी पर्यंतची बीआरटी वेगवेगळ्या आंदोलनानंतर उखाडली गेली परंतु त्यापुढे राहिलेला २५% बीआरटी रस्ता अजुन किती लोकांचे जीव गेल्यावर आपण हटवणार आहात ?असा संतप्त सवाल प्रवांशासह नागरिक करत आहेत. नुकतेच चंदननगर बीआरटी रस्त्याचे यमराज चौक असे नामकरण करून शिरूर तालुका मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पऱ्हाड यांनी हटके आंदोलन केले आहे. तदनंतर याच ठिकाणी बीआरटी च्या तुटलेल्या कढड्याने वाहनचालकाला अंदाज न आल्याने अपघात घडले आहेत. महानगरपालिकेला या सातत्याने घडणाऱ्या अपघाताच्या मालिकांचा अजूनही अभ्यास करायचा आहे का? असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. अजुन किती जीव जाऊ द्यायचे आहेत. या बीआरटी मुळे आतापर्यंत कितीतरी लोकांना आपले जीव गमवावे लागले तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले. मात्र महानगरपालिका आपल्या डोळ्यावरची पट्टी काढायला तयार नाही असे दिसते.
*अधिकाऱ्यांनी एक सामान्य प्रवाशी म्हणून एकदा पाहावे*
महानगरपालिका अधिकारी यांना एवढी आंदोलने जर होत असतील तर या गोष्टीकडे एक जबाबदार व्यक्ती म्हणून या गोष्टीकडे पाहण्याची गरज आहे. या बीआरटी ची खरंच गरज आहे का तर या ठिकाणी गावाकडचा एखादा आलेला नागरिक सुद्धा इथली भयान वास्तविकता बघून नक्की सांगेल की ही बीआरटी म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. महानगरपालिकेने आता ठोस पावले उचलत राहिलेल्या बीआरटी बाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. तेव्हा कुठे हा रस्ता मोकळा श्वास घेऊ शकेल आणि नागरिकही तुमच्यावर अभिनंदनांचा वर्षाव करतील.ही जबाबदारी तुमची आहे मग एक माणूस म्हणून आपण आपल्याच लोकांचे जीव घालवत आहोत यांचा शास्वत विचार करण्याची गरज अधिकाऱ्यांना आहे. बीआरटी हटवण्याच्या परवानग्या आपल्या जर अखत्यारीत जरी नसल्या तरी पाठपुरावा करायचे नक्कीच आपल्या हातात आहे. लवकरच यावर तोडगा निघून बीआरटी हटवली जाईल असा विश्वास मात्र नागरिक वेळोवेळी व्यक्त करत आहेत याच प्रयत्नांना आता यश मिळो एवढीच नागरिकांची इच्छा!