
म्हणाले ‘औरंगजेबाच्या कबरीवर ज्यांनी…
गेल्या काही रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा चर्चेचा विषय राहिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी समोरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी केल्यानंतर प्रकरण आणखी चर्चेत आलंय.
या मागणीच्याविरोधात धनगर समाजातील काही नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतलीये. अशातच आता ‘वाघ्या’ कुत्र्याच्या समाधीचा मुद्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. त्यावर संभाजीराजेंनी सडकून प्रत्युत्तर दिलंय.
प्रकाश आंबेडकर म्हणाले मोक्का लावा
संभाजीराजे छत्रपती यांना सरळ उचलून मोक्का लावावा. देशाच्या कायद्याच्या विरोधात भूमिका घेण्याच्याचं लांगूलचालन करणं योग्य नसल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यावर उत्तर देताना संभाजीराजे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिल्याचा विषय काढला.
मी काय चुकीचं बोललो? – संभाजीराजे
वाघ्या कुत्र्याचा पुतळा हा वेगळा विषय आहे. पण काहीजण हा वेगळ्याच मुद्दयावर विषय घेऊन जातात, असं संभाजीराजे म्हणाले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर संभाजीराजे यांनी वक्तव्य केलं. माझा स्वभाव संयमी आहे. सर्वांना सोबत घेऊन जायचं असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला.
औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिली त्यांना…
प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असल्याने मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. दुसरं कुणी असतं तर मी जोरात उत्तर दिलं असतं. माझ्या सुसंस्कृत नेत्याचा शिक्का आहे, त्यामुळे मी काही बोलणार नाही. ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिली, त्यावर मी काय बोलणार? अशी टीका संभाजीराजेंनी केली.
दरम्यान, वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्याचा अल्टिमेटम सरकाराला 31 तारखेपर्यंत मुद्दामच देण्यात आल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून होत असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी करण्यात आला. त्यावर देखील संभाजीराजे यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.