
दैनिक चालु वार्ता उमरगा वार्ताहर
श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्था संचलित, श्री सिद्धेश्वर विद्यालय कसगी,ता. उमरगा येथील श्री बसवराज शंकरराव कुंभार यांचे 35 वर्ष 02 महिने अखंड सेवापूर्ती सत्कार निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षणा संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव बदोले, संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव पटणे, उपाध्यक्ष विजयसिंह राजपूत, ज्येष्ठ संचालक रामराव मोरे, भीमाशंकर नंदर्गे, भीमाशंकर बोरुटे, विश्वनाथ नंदर्गे विनय बदोले, गावातील बसवराज चनपटणे
सेवानिवृत्त शिक्षक बसवराज हिरेमठ सर
सेवानिवृत्त क्लार्क मल्लिकार्जुन कलशेट्टी
कोथळी शाळेचे मा.मुख्याध्यापक राजेंद्र गुरव सर सुभान चव्हाण सर. त्यांच्या उपस्थितीत संस्थेकडून सहपत्रिक भरती आहेर भेटवस्तू देऊन सेवेचा गौरव करण्यात आला.
सन 1990 साली बसवराज कुंभार सेवक म्हणून शाळेत रुजू झाले. त्यांच्या कुशल कार्याच्या संस्थेने दखल घेऊन सेवक पदावरून बढती लॅब असिस्टंट ज्युनिअर क्लर्क सीनियर क्लार्क आणि रिटायरमेंट होताना. संस्थेचे संचालक पदावरती काम करण्याची संधी संस्थेने उपलब्ध करून दिली. अशी दुर्मिळ घटना देशाचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यानंतर बसवराज कुंभार यांच्या कार्याचा कामावरील निष्ठेचा, विद्यार्थ्यांच्या हिताचा, शाळा, संस्था, विषय असलेली कामाप्रतीची आत्मीयता बसवराज कुंभार यांच्या पदाच्या चढत्या पायऱ्या मिळत गेल्या आणि ते कामाच्या निष्ठेने करत गेले. असे कर्मचारी संस्थेला मिळणे आमचे भाग्य आहे असे गौरव उदगार श्री विठ्ठलराव बदोले यांनी आपल्या मनोगत आतून बसवराज कुंभार यांचे गौरव केले.
यावेळी शाळेकडून मुख्याध्यापक राजेंद्र माशाळे आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मायेची शान फेटा देऊन सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर बदोले उच्च माध्यमिक विद्यालय कडून प्राध्यापक अरुण काडरामे आणि त्यांचे सहकारी विठ्ठल रूखमाई देवतांचे प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
सिद्धेश्वर विद्यालय शिक्षकांची पतसंस्था यांच्याकडून भाऊसाहेब पाटील यांच्याकडून शाल श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
राजेंद्र गुरव सर यांच्या कडून संपत्ती भरती आहे देऊन सत्कार करण्यात आला.
श्री सिद्धेश्वर वस्तीग्रह कडून वस्तीगृहातील विद्यार्थी भेटवस्तू देऊन मामाचा सत्कार करण्यात आला.
विद्यालयाच्या प्रत्येक वर्गाकडून वर्ग प्रतिनिधी अनेक भेटवस्तू देऊ सत्कार करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्षीय समारोपात बदोले साहेब, कार्यक्रमासाठी झटणाऱ्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.