
दैनिक चालु वार्ता म्हसळा -( रायगड )अंगद कांबळे
म्हसळा – रायगड जिल्हा खासदार, भारत पेट्रोलियम आणि गॅस समिती अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या विकास निधीतून म्हसळा नगराच्या विकासासाठी निधीचा पाऊस पडत असताना नव्याने खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नाने सीआरएस फंडातून म्हसळा नगर पंचायत हद्दीतील राजीप शाळा सावर,म्हसळा शाळा नंबर १ आणि ऐतहासिक वास्तु असलेली मराठी मुलांची शाळा डिजीटल करण्यासाठी तब्बल दिड कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.प्राथमिक शाळेतील गोर गरीब कष्टकऱ्याचे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून देण्यात आले असल्याचे खासदार तटकरे यांनी भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना सांगितले.या निधीतून शाळेत संगणक कक्ष,संगणक,ग्रंथालय,ऑफिस ,पाणी पुरवठा साठवण टाकी,टॉयलेट,क्रीडा आदी साहित्यासह रंगरंगोटी करण्यात येईल.एकाच दिवशी खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा नगरातील प्राथमिक शाळा डिजीटल कामाचे भूमिपूजन,अंजुमन हायस्कूल आणि ज्यु कॉलेज करीता ५५ संगणक आणि न्यू इंग्लिश स्कूल येथे नव्याने २५ संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याचे उद्घाटन खासदार सुनिल तटकरे यांनी केले. याच वेळी न्यू इंग्लिश स्कूल येथे संपन्न स्वागत कार्यक्रमात म्हसळा तालुक्यातील आदिवासी बांधवांना सौर उर्जेवर चालणारे दिवे वाटप करण्यात आले. अंजुमन हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजीत स्वागत कार्यक्रमात खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुका आणि शहराचे विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही.दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जे मागाल ते उपलब्ध होईल येत्या १ मे पर्यंत सर्वच शाळा,विद्यालयात क्रीडा साहित्य आणि संगणक उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे संबंधीत अधिकारी आणि शाळा समिती पदाधिकारी यांना सुचित केले.म्हसळा शहर नेहमी प्रकाशमय रहावा यासाठी स्ट्रीट लाईट करीता नव्याने १० हायमास्ट दिवे आणि ४०० दिवे एलईडी पथदिवे मंजुर करण्यात आले आहेत जेणेकरून अंधराचा फायदा घेऊन वाईट प्रवृत्ती असलेल्यांकडून कोणतीही विपरीत घटना घडु नये असेही त्यांनी नमूद केले.खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुका शहरात शिक्षण,आरोग्य आणि लोकपयोगी विकास कामे करण्यात इतका मोठा योगदान देऊ केला आहे की त्याचे कौतुक व ऋण फेडण्यासाठी शब्द अपुरे पडतात असे असताना अंजुमन हायस्कूल मधील कॉलेजच्या विद्यार्थ्यानी अख्खलीत मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतून शेरो शायरीने खासदार सुनिल तटकरे यांच्या कामाचे गुणगान गायले.न्यू इंग्लिश स्कूलचे प्रो.मांजरेकर यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्या कार्याचा परिचय खास काव्य रचनेतून केला.सावर गौल वाडी,कन्या शाळा, मराठी मुलांची शाळा नं.१,अंजुमन हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे आयोजीत भूमिपूजन व संगणक हस्तांतरण कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे यांच्या समावेत तहसिलदार सचिन खाडे,गट विकास अधिकारी माधव जाधव,मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,पोलिस निरीक्षक संदीप कहाले,शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण,तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,माजी सभापती बबन मनवे,माजी सभापती नाझिम हसवारे,
नगराध्यक्ष संजय कर्णिक,उप नगराध्यक्ष संजय दिवेकर, कुणबी समाज नेते महादेव भिकू पाटील,मधुकर गायकर,संदीप चाचले,नगर पंचायत सभापती सुनिल शेडगे,सुहेब हळदे,शहर अध्यक्ष रियाज घराडे,सतिश शिगवण,अनिल बसवत,किरण पालांडे,माजी नगराध्यक्षा जयश्री कापरे,नगर सेविका राखी करंबे,सरोज म्हशिलकर,मुस्लीम समाज अध्यक्ष नाजीम चोगले,अंजुमन हायस्कूल चेअरमन फझल हलदे,नासीर मिठागरे, मजहर काझी,शाहिद उकये, रफिक घरटकर,रियाज फकीह,प्राचार्य शेख,प्राचार्य धर्मसिंग पाटील आदी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.