
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठलवाडी येथील गुरुकृपा क्लिनिक डॉ.क्षितिजा धनराज वाळके गवारी यांच्या मुख्य पुढाकारातून व डॉ.रघुनाथ रामकर यांच्या विशेष सहकार्यातून विठ्ठलवाडी परिसरातील शेतकरी ग्रामस्थांकरिता आरोग्य शिबिर आयोजित केले होते.ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील लोकांचे आरोग्य विषयी जनजागृती आणि विविध तपासण्या एकाच छताखाली व्हाव्यात या हेतूने वाघोली येथील प्रसिद्ध नामांकित डॉ.रघुनाथ रामकर यांच्या आयमॅक्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मधील तज्ञ अनुभवी डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन कार्यशाळा उत्तमरीत्या संपन्न झाले.विठ्ठलवाडी परिसरातील 120 शेतकरी बांधवांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे.तसेच यावेळी नागरिकांच्या विविध तपासण्या देखील करण्यात आल्या आहे.या आरोग्य शिबिरात पुरुषवर्ग आणि महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सभापती अनिल भुजबळ,बाळासाहेब भुजबळ,भूमी फाउंडेशनचे डॉ.कैलास पवार,भाजपा प्रदेश सचिव जयेश शिंदे,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस,अर्जुनराव तोडकर,भरत भुजबळ,बाळासाहेब गवारे ,दिलीप अण्णा गवारी,मधुकर दोरगे,धनराज वाळके,बापू पवार,डॉ.क्षितिजा वाळके,वसंत भाऊ वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.या आरोग्य शिबिर प्रसंगी विठ्ठलवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी डॉ.क्षितिजा वाळके गवारी यांचे कौतुक करीत आभार मानले.