
दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी- ज्ञानेश्वर साळुंके
अंबड: तालुक्यातील पानेगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत लोकसभागीय पद्धतीने गावच्या सूक्ष्म नियोजनाची प्रक्रिया राबवण्यास आज मशाल फेरी काढून करण्यात आली. गावात मशाल फेरी घेऊन प्रकल्पाची जनजागृती करण्यात आली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गावची निवड झाल्यानंतर सूक्ष्म नियोजन प्रक्रिया राबवली जात असून यामध्ये प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यावेळी ग्राम विकास समिती चे अध्यक्ष सरपंच योगिता संजय सानप कृषी सहाय्यक आर जी मोहिते तसेच ग्राम विकास समितीचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.