
दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनिधी- शिवराज पाटील
उष्णतेच्या प्रमाणात कमालीचा बदल होत आहे. उन्हाचा चांगलाच पारा वाढत असल्याने पशु पक्षी यांच्यासह प्राण्यांची तहान भागवण्यासाठी उमरगा व लोहारा तालुक्यातील फॉरेस्ट क्षेत्रावर वनविभाग अंतर्गत ४५ पानवटे तयार करून पाण्याची सोय करण्यात आली आहे. गरजेनुसार पानवटे भरून घेतले जात आहेत. यामध्ये फॉरेस्ट क्षेत्रावरील पशुपक्षी व प्राण्यांची मोठी सोय होत असल्याचे उमरगा वन परिमंडळ अधिकारी मुक्ता गुट्टे यांनी सांगितले आहे.
तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आगामी पाणीटंचाई व उन्हाळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फॉरेस्ट क्षेत्राबाहेर जावं लागू नये, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय फॉरेस्ट क्षेत्रांमध्ये व्हावी म्हणून वनविभागाने तयार केलेल्या पाणवठ्यामध्ये पाणी टाकण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. यासह पशु-पक्षी व प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी वनविभागमार्फत विशेष दक्षता घेतली जात आहे.
विहिरीच्या पाण्याच्या पातळीने खालावलेली आहे. पाण्याचा शोध घेत फिरताना अनेकदा मानवाबरोबरच संघर्ष करावा लागत आहे. तसेच त्यांना विहिरीत पडून जिवासही मुकावे लागत आहे. उमरगा तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मार्च एप्रिल महिन्यामध्ये परिस्थिती असताना मे महिन्यामध्ये उन्हाची आणखी तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाचा फटका जितका नागरिकांना बसत आहे. तितकाच पशुपक्षांनाही बसत आहे. यावरून वनविभागाचे पानवटे पशुपक्षी व प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जे. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. असे वन परिमंडळ अधिकारी मुक्ता गुट्टे यांनी सांगितले आहे.