
दैनिक चालु वार्ता वर्धा उपसंपादक- अवधूत शेंद्रे
वर्धा – आष्टी :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० कलमी कार्यक्रमांतर्गत आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश जोशी यांनी पोलीस स्टेशन स्तरावरील, उपायोजना व सुधारणा संदर्भाने पोलीस स्टेशन मधील सन २०१५ ते सन २०२२ पर्यंतचा कालबाह्य रेकॉर्ड नाश करण्यात आला. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन राष्ट्रीय अंतर्गत उत्तम प्रकारचे सुशोभीकरण व नागरिकांकरिता अभ्यागत कक्ष , स्वच्छ प्रसाधन गृह, वृक्षारोपण इत्यादीं बाबत उपाययोजना करण्यात आलेली असून पोलीस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांना तसेच तक्रारदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे ठाणेदारांनी अल्पावधीतच अथक परिश्रम घेऊन सदरच्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात याकरिता पाठपुरावा केलेला आहे. उत्तम नियोजन आणि पोलीससेवा यासाठी ठाणेदार राजेश जोशी ॲक्शन मोडवर आहेत अशी नागरिकात चर्चा आहे