
दैनिक चालु वार्ता वर्धा उपसंपादक -अवधूत शेंद्रे
शिक्षणाधिकारी देशपांडे यांची वायुसेनेत वीस, आश्रमशाळेत ६ आणि आष्टी पंचायत समितीमध्ये १४ वर्षे सेवा
—————————————-
अतिदुर्गम भागातील नोकरीसह
२ विदयार्थ्यांच्या हृदयरोग शस्त्रक्रियेत परिपूर्ण सहभाग
—————————————-
आष्टीत विनातक्रार १४ वर्षे सेवा संपन्न
वर्धा – आष्टी :-येथील पंचायत समितीचे प्र.गटशिक्षणाधिकारी प्रमोद श्रीनिवास देशपांडे नियत वयोमानानुसार ३१ मार्च २०२५ सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त्याने सर्व शिक्षक वर्ग आणि विविध शिक्षक संघटना प्रतिनिधी आणि शिक्षण विभाग कर्मचारी वर्ग यांनी सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजित करून शिक्षणाधिकारी प्रमोद देशपांडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्राची देशपांडे यांचा भव्य दिव्य पद्धतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी विशेष भेटवस्तू शिक्षणाधिकारी देशपांडे यांना दिल्या शिक्षणाधिकारी देशपांडे यांच्या कर्तव्याप्रती उपस्थित मान्यवरांनी कौतुकाचा वर्षाव केला त्यात आष्टी पंचायत समिती कार्यक्षेत्रात तब्बल १४ वर्ष विनातक्रार सेवा दिली त्यामुळे आष्टी पंचायत समितीच नव्हे तर संपूर्ण वर्धा जिल्ह्यात आपल्या कर्तव्याप्रती सजग अधिकारी म्हणून त्यांनी संपूर्ण जिल्ह्याभरात ओळख निर्माण केली शिवाय शासकीय अहवालानुसार वर्धा जिल्ह्याच्या शिक्षण विभागात आष्टी शिक्षण विभाग अव्वलस्थानी ठेवण्याचे श्रेय फक्त आणि फक्त देशपांडे यांच्याकडे जाते शिक्षणाधिकारी देशपांडे यांची कर्तव्यप्रती असलेली निष्ठा,प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परता अश्या अनेक गुणांमुळे ते अनेक शिक्षकांचे प्रेरणास्थान आहेत त्यांच्या विशेष कार्यशैलीमुळे प्रत्येक शिक्षकांचे ते लाडके ,आदर्श गटशिक्षणाधिकारी ठरले आहेत आष्टी येथे पदभार सांभाळण्यापूर्वी अतिदुर्गम भागातील आश्रम शाळेत सहा वर्षे नोकरी केली याहीपेक्षा उल्लेखनीय म्हणजे भारत देशाच्या वायुसेनेमध्ये तब्बल वीस वर्षे सेवा देऊन संरक्षण विषयक देशसेवा केली त्यांच्या या कामाची पावती म्हणून तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांनी एकत्रित नियोजन करून शिक्षणाधिकारी देशपांडे यांचा सेवापुर्ती सोहळा दिनांक १/४/२०२५ ला शिवानी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा केला.सदर सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण, प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी पद्मा तायडे,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी रियाज खान, कनिष्ठ विस्तार अधिकारी संजय भुरे,आष्टी केंद्र प्रमुख गजानन पुरी,रवींद्र राठोड उपस्थित होते. या कार्यक्रमांचे विशेष आकर्षण म्हणजे देशपांडे यांचे आप्तपरिवार,नातेवाईक व मित्र मंडळी उपस्थित होते तालुक्यात अशा प्रकारचा सेवापूर्ती सोहळा कधीच संपन्न झाला नाही अशी चर्चा कार्यक्रम स्थळी ऐकायला येत होती त्यामुळे गटशिक्षणाधिकारी प्रमोद देशपांडे यांचे सर्व शिक्षकांप्रती असलेले नाते हे फार आत्मीयतेचे होते असे दिसून येते सोबतच व्याही सुनील व विहीणबाई सौ. विद्याताई खडसे यांच्यासह विविध क्षेत्रातील गण्यमान्य व्यक्ती सुद्धा देशपांडे यांच्या कर्तव्याप्रती गुणगान व्यक्त करतात एवढे मात्र सत्य
प्रतिक्रिया
मला मानसन्मान प्राप्त करण्यात माझी सहचारिणी प्राची देशपांडे हिचा अनमोल सहभाग आहे ती केवळ जेवणाचा डब्बा तयार करण्यापूर्ती मर्यादित नव्हती तर माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून माझी पाठीराखी ठरली माझ्या नोकरीत मोलाची साथ दिली रात्री बेरात्री ऑनलाईन काम करत असताना मदत मिळाली, ताण तणावाचे व्यवस्थापन केले आज रोजी जो मला मानसन्मान मिळाला आहे तो माझ्या सहचारीणी शिवाय अशक्य होता असे मी मानतो त्यामुळे सौ.प्राचीला माझा सॅल्यूट आहे सोबत माझे अधिकारी,सहकर्मचारी,प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मला सहकार्य करणारे माझे मित्र परिवार यामुळे सर्व ह्या गोष्टी शक्य झाल्यात एवढा मोठा कार्यक्रम घेऊन माझा गौरव केल्यामुळे मी भारावून गेलो आहे अशा प्रकारचा सन्मान होणे हे माझे भाग्य समजतो आणि सर्वांचे आभार मानतो
प्रमोद देशपांडे
सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी
पं.स. आष्टी जि.प.वर्धा