
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्याच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली येथील पंचायत समीतीवर धडक मोर्चा काढून युती सरकारचा तीव्र निषेध करण्यात येऊन येथील गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात गाय गोटा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना आपल्या स्तरावरून राबविले जाते परंतु गाय गोटा विहीर घरकुलाच्या लाभार्थ्यांना मंजूर अनुदान देण्यासाठी लाभार्थ्याकडून कंत्राटी अभियंता ग्रामसेवक व पंचायत समिती मधील कर्मचारी यांच्या संगणमताने घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाचा धनादेश खात्यावर जमा करायचा असेल तर १००००/- ते १५०००/- हजार रुपये द्या नाहीतर तुम्हाला अनुदानाची रक्कम लवकर मिळणार नाही असे सांगत आहेत. सदरील अनुदान काढण्यासाठी पैसे नाही दिले तर तुम्हाला एकही रुपया तुमच्या खात्यावर पाठवले जाणार नाही असे भाष्य ग्रामसेवक, कंत्राटी अभियंता यांच्याकडून करण्यात येत आहे. अनेक घरकुलधारकांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी ग्रामसेवक गावातील दलालांना सांगून तक्रारी देण्यासाठी भाग पाडत आहेत व घरकुलधारकांना पैश्याची मागणी करुन त्रास देत आहेत, त्याबद्दल विचारणा केली तर त्या घरकुलधारकांना आरेरावीची भाषा वापरली जात आहे.
गाय गोठा व विहीर मंजूर करण्यासाठी दहा ते वीस हजार घेऊन मनमानी पैशाची मागणी केली जात आहे व ज्या लाभार्थ्यांनी सदरील रक्कम दिली तरच त्यांना विहीर व गाय गोटा मंजूर केला जात आहे व बाकी गोरगरीब लाभार्थी हे दरवर्षी प्रमाणे प्रस्ताव सादर करून चक्राच मारण्यात व्यस्त आहेत.
लाभार्थ्याकडून एकही रुपया न घेता सदरील अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे जर अनुदान वाटप झाले नाही तर याद राखा गाठ शिवसेनेशी आहे असा दम जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी दिला.
ग्रामसेवक, अभियंता व संबंधित अधिकारी यांचा पगार किती आहे आणि त्यांची प्रॉपर्टी किती आहे याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व दोषी असणाऱ्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वश्री जबाबदारी आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी,उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, विधानसभा संघटक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. संतोष रोडगे सर, तालुकाप्रमुख दत्ता हेंगणे, माजी तालुकाप्रमुख विलास पवार हंगरगेकर, तालुका संघटक तथा एस टी कामगार सेना प्रमुख मार्गदर्शक अनिकेत फुलारी, नगरसेवक संदीप चौधरी, किसान सेना तालुका अध्यक्ष सुधाकर जायभाये, सिद्धेश्वर औरादे,जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, शहर प्रमुख शिवा कासले, उपतालुका प्रमुख गणेश माने, तिरुपती पाटील, पवन देऊळकर, लहू बारवाड, उपशहरप्रमुख शिवकुमार बेद्रे,विभाग प्रमुख व्यंकट सुरकुटे, गजानन येन्ने, सोमनाथ आढाव, भगवान कदम,गणेश चव्हाण विश्वनाथ पवार विठ्ठल भोगे प्रदीप जायभाय कालिदास धुळगुंडे, भरत कदम, बाळू भोसले, अविनाश क्षीरसागर, विठ्ठल मंगे, अमर कोरे, राजू थगनर दत्ता कदम गंगाधर कल्याण नागनाथ कल्याण , संतोष सुर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.