
दैनिक चालु वार्ता उमरगा वार्ताहर -मनोजकुमार गुरव
उमरगा-लोहारा (धाराशिव)
महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ संलग्न
धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ धारावीच्या वतीने सन 2025 सालापासून धाराशिव जिल्ह्यातील विज्ञान विषयाच्या अध्यापन करणाऱ्या, जिल्हास्तरीय आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा ज्ञान प्रबोधिनी विद्यालय हरळी तालुका लोहारा येथे संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ दयानंद जटनुरे अध्यक्ष म्हणून उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी सर प्रमुख अतिथी
राज्यध्यक्ष दिनेश पवार रवि नरहिरे अभिजीत कापसे अंजीक्य पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कर 16 संपन्न झाले. धाराशिव जिल्हा प्रतेक तालुक्यातील एका विज्ञान शिक्षकास पुरस्कार खालिल प्रमाणे देण्यात आले.
१ श्रीमती सुहासिनी दगडू जाधव धाराशिव
२ श्रीमती साधना त्र्यंबक पाटील तुळजापूर
३संजीवकुमार बाबुराव भोयटे लोहारा
४ श्रीमती सारिका श्रीराम ढेपे वाशी
५ तात्यासाहेब किसनराव पाटील परंडा
६ परमेश्वर रावबहादूर सुतार उमरगा
७ सुधीर निवृत्ती इंगळे भूम
८ तुकाराम सुधाकर गरुडे कळंब
९ संतोष लक्ष्मणराव येवले लोहारा
या विज्ञान शिक्षकांना धाराशिव जिल्ह्याचा डॉ. सी व्ही रमण जिल्हास्तरीय आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले आहे
या कार्यक्रम आयोजित करण्यासाठीं रविंद्र स्वामी सर अध्यक्ष धाराशिव जिल्ह्या विज्ञान अध्यापक मंडळ व उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष सचिव सदस्य यांनी यशस्वीपणे पार पाडले