
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड देगलूर
दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी बंडयआप्पा मठ देगलूर येथे शिवा संघटनेची बैठक संपन्न झाली. शिवा संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 894 व्या जयंती चे नियोजन करण्यात आले . प्रति वर्षी प्रमाणे यंदाही देगलूर येथे शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्या द्वीपांधवडा मध्ये दिलेल्या तारखेला भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यापूर्वी दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शिवा संघटनेच्या वतीने निघणाऱ्या महात्मा बसवेश्वर जयंतीच्या भव्य मिरवणुकीत देगलूर तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, त्याची जय्यत तयारी सर्व पदाधिकाऱ्यांनी करावी असे बैठकीमध्ये सर्व शिवा संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आव्हान करण्यात आले. या बैठकीस शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव बुड्डे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक मजगे, तालुका अध्यक्ष सुभाष चैनपूरकर , कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय बिराजदार, तालुका अध्यक्ष विश्वनाथ पाटील , संजय अण्णा तोनसुरे तसेच बसवराज पाटील वनाळीकर , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पाटील , जिल्हा उपाध्यक्ष घोडके ताई, व अन्य तालुक्यातील सर्व शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.