
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूगाव .येथील माळीनगर मधील क्रांतीसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठान च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
प्रतिष्ठान च्या वतीने सकाळी पुणे येथील महात्मा फुले वाड्यातून ज्योत आणण्यात आली.त्या नंतर येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या जवळ या ज्योतीचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर महात्मा फुले यांच्या पुतळ्यास देहूनगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर ,वृक्षदायी संस्था देहूगाव आणि महात्मा फुले प्रतिष्ठान माळीनगर यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या १९८ व्या जयंती निमित्त देहूच्या गायरणातील ऑक्सिजन पार्क मध्ये १९८ देशी वृक्षाची लागवड करण्यात आली.
यावेळी वृक्षदायी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे ,देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे , उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण , गटनेते योगेश परंडवाल , नगरसेवक योगेश काळोखे , मयूर टिळेकर ,स्वीकृत नगरसेवक अमित टिळेकर , माजी स्वीकृत नगरसेवक प्रदीप परंडवाल , माजी सरपंच सुनीता टिळेकर , उपसरपंच संतोष हगवणे, तसेच सीमा टिळेकर ,ज्योती टिळेकर ,शिल्पा परंडवाल ,राजेश्री भुजबळ , संदीप परंडवाल , तसेच प्रतिष्ठानचे सर्व सभासद उपस्थित होते.