
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
नांदेड देगलूर
-दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे १८ रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील शस्त्रक्रियांची सुरुवात करण्यात आली असून एप्रिल २०२५ पासून ते आज पर्यंत एक सिझेरियन शस्त्रक्रिया, तीन कुटुंब कल्याण स्त्री शस्त्रक्रिया,दोन पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, एक अपेंडिक्स, एक पाठीवरील गाठ, आदींसह १८ मोतीबिंदू शस्त्रक्रिया १ एप्रिल ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत करण्यात आले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर तहाडे यांनी केले. सदर शिबिर यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर सर, डॉक्टर आपनगिरे सर, (वर्ग १ नेत्र शैल्य चिकित्सक) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.नरेश देवणीकर (वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय देगलूर) यांच्या देखरेखी खाली भूलतज्ञ डॉ. अनिल थडके, नेत्र अधिकारी श्री सिद्धेश्वर साहेब, शुभम ,कसबे साहेब, धुमाळे सिस्टर, भंडारवाड सिस्टर, जमील व सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.