
दैनिक चालु वार्ता जुन्नर प्रतिनीधी – संदीप कांबळे
पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला असलेल्या जुन्नर तालुक्याला अचानक आलेल्या अवकाळीचा जबरदस्त तडाखा बसला.तास भर वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने अचानक हजेरी लावली,तर काही ठिकाणी जोरदार पावसा सह झालेल्या गारपीठी मुळे रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने काही काळ रहदारी ही खोळंबली होती,नंतर काही वेळानी रस्त्यावरची झाडे बाजूला केल्यानंतर रहदारी पूर्ववत करण्यात आली.
अचानक पडलेल्या जोरदार अवकाळी ने कांदा,आंबा,द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणी सुरू असताना,शेतातच पडून असलेला कांदा अचानक आलेल्या जोरदार पावसाच्या पाण्यात भिजून नुकसान होऊ नये या साठी शेतकऱ्यांना प्लॅस्टिक च्या कागदाने कांदा झाकण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली.
बळीराजा शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने,मेहनतीने आपल्या शेतात शेतमाल पिकवला,मात्र ऐन उन्हाळ्यात आलेल्या अवकाळींचे संकट कोसळल्याने बळीराजा शेतकऱ्याच्या तोंडचा घास जातो की काय ही चिंता शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.