
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक आणि हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून गौतम लब्धी फाउंडेशनच्या वतीने “गौतम लब्धी कलश संकलन” आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.
श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ, महर्षी आनंद युवा मंच आणि गौतम लब्धी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी येथे हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ६८ रक्तदात्यांनी सहभाग घेत आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.
या शिबिरासाठी पीएसआय (पुना सेरो लॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर) यांचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना विशेष भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन तुषार नहार, अंकुर धोका, धीरज बागमार, परेश चोरडिया, अविनाश बोरुंदिया , राजेंद्र बाफना, रितेश कोलन, ललित चोपडा, भूषण धोका, युवराज वडगावकर, महावीर मुथा, वर्धमान बाफना,विकास चोरडिया
आशिष बाफना.वर्धमान बाफनाअभिनंदन चोपडा, धीरज लोढा यांनी केले.
या उपक्रमाबाबत अधिक माहिती आळंदी गौतम लब्धी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सचिन बोरुंदिया यांनी दिली.