
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
मा.पोलीस आयुक्त सोो, पिंपरी चिंचवड यांनी मालमत्ता चोरीच्या गुन्हयांचा कसुन तपास करून गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या असुन त्या अनुषंगाने दिनांक 09/04/2024 रोजी आंळदी पोलीस स्टेशन गुरनं. 147/2025 बी एन एस कलम 303 (2) मधील चोरी गेले बैट-याचा शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार यांनी चिंबळी, मोशी, दिधी परिसरातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे पाहुन आरोपीचा तपास करत असताना दिनांक 12/04/2025 रोजी तपास पथकातील अंमलदार पो.हवा./1485 वहिल यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चिंबळी फाटा येथे आंळदी पोलीस स्टेशन हददीतील बर्गेवस्ती येथील हिताची एटीएम मधील बैटरी चोरी करणारा चोर चिंबळी फाटा येथे बैटरी विकण्यासाठी आला आहे. त्यावेळी लागलीच पो.हवा./505 लोणकर, पो. हवा./1485 वहिल, पो.शि. / 2326 नरवडे, असे चिंबळी फाटा येथे येवुन मिळाले बातमी विकाणी वॉच करून संशयीत इसमास ताब्यात घेवुन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव दत्तात्रय विठठल भोसले वय 44 रा. समर्थकॉलनी कृष्णकुंज बिल्डींग दिघी ता हवेली जि पुणे मुळ रा. स्वामीसमर्थ मदिरासमोर अक्कलकोट जि सोलापुर असे असल्याचे सांगितले. त्यास आंळदी पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन त्याचेकडे सदर बॅट-या चोरी बाबत चौकशी केली असता प्रथमता त्याने उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की, दिनांक 06/04/2025 रोजी मी बर्गेवस्ती चिंबळी येथील हिताची कंपनीचे एटीएम मधील 3 बैट-या चोरी केल्या असल्याचे सांगितले. तसेच सदर आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याचेकडुन एकुण 4,00,000/- रू. किंमतीच्या आंळदी पोलीस स्टेशन, चाकण पोलीस स्टेशन व महांळुगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीतील बॅट-या जप्त करून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अ.क. पोलीस ठाणे 1 आळंदी
गु.रजि.नं. व कलम 1) 147/2025 बी.एन.एस. कलम 1 303 (2) प्रमाणे
जप्त मुद्देमालाचे वर्णन
2 चाकण
1) 224/2025 बी.एन. एस. कलम 303 (2) प्रमाणे
1) 50,000
3 महांळुगे
1) 24/2025 बी.एन.एस. कलम 305 प्रमाणे-
1)
2) 224/2025 बी.एन.एस. कलम 3) 305 प्रमाणे
) 50,000/- रू किंमतीच्या एटीएम मशीनच्या बॅकअप साठी लागणा-या 3 रिर्चारबेल बैट-या जू.वा.कि.अ.
/- रू किंमतीच्या एटीएम मशीनच्या बॅकअप साठी लागणा-या 3 रिर्चारबेल बॅट-या जु.वा.कि.अं.
50,000/-रू किंमतीच्या एटीएम मशीनच्या
बैंकअप साठी लागणा-या 3 रिर्चारबेल बैट-या जु.वा. किं.अं.
2.50,000/- रू किंमतीच्या एटीएम मशीनच्या बैंकअप साठी लागणा-या 15
रिर्चारबेल बॅट-या जुवा. किं.अं.
येणे प्रमाणे वरील वर्णनाचा मुद्देमाल आरोपी नाम दत्तात्रय विठठल भोसले वय 44 रा.दत्तकॉलनी कृष्णकॉलनी दिधी ता हवेली जि पुणे मुळ रा. स्वामीसमर्थ मदिंरासमोर अक्कलकोट जि सोलापुर याचेकडुन जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सोो, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3. श्री. डॉ. शिवाजी पवार सो, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्रसिंह गौर सो, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भिमा नरके सोो, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पो.हवा. / 505 लोणकर, पो. हवा./ 1485 वहील, पो.हवा./1134 होले, पो.शि./2380 नरवडे, पो.शि./2012 दहिफळे पो.शि. / 1306 खेडकर, पो.शि./2336 डुमनर, पो.शि./3271 सुर्यवशी, पोशि/2354 डिकले. पोशि/2707 सातपुते यांनी केली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा./505 लोणकर हे करीत आहेत.