
राज्यव्यापी आंदोलनाचा दिला इशारा…
अहिल्यानगरच्या राहुरीत घडलेल्या महापुरुष पुतळा विटंबना घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, मागणीसाठी सुरू असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं अन्नत्याग उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित झालंय.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईने हे उपोषण स्थगित करण्यात आलंय. आता आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिलाय.
26 मार्च रोजी राहुरी शहरात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली होती. आज राहुरी येथे जाऊन शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केले असल्याने समस्त महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या भावना दुखावलेल्या आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत कुठल्याही आरोपीला अटक झालेली नसल्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असून आमच्याही या वीघातक घटनेमुळे भावना दुखावल्या आहे. यामुळे आमरण उपोषण सोडून आंदोलन सुरूच ठेवावे, असे आवाहन आणि आग्रह करत उपोषण सोडविले, अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
पोलीस प्रशासनांने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पुढील 48 तासांत आरोपीला अटक करावी. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान तुमच्यासाठी सर्वतोपरी असून त्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी दिला. याप्रसंगी माझ्यासमवेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, माजी आमदार दादाभाऊ कळंबकर, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे आणि तालुकाप्रमुख सचिन म्हसे उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात 26 मार्च रोजी दिवसाढवळ्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. घटनेला 20 दिवस उलटूनही आरोपीला अटक झाली नाही, यामुळे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. तिसऱ्या दिवशी तनपुरे यांची प्रकृती खालावली आणि वजनही कमी झाले. त्यामुळे त्यांना उपोषणस्थळी सलाईन सुरू करण्यात आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून हे उपोषण स्थगित करण्यात आले.
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पुतळा विटंबन प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधलाय. अलीकडच्या काळात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना घडत आहेत. सोलापूरकर, कोरटकर दोन्ही लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कशा पद्धतीने बोलले? हे सर्व सगळं जाणीवपूर्वक चाललं आहे. लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत.
राहुरीची घटना याचाच भाग असावी अशीच वाटतेय. फोटो बघितल्यानंतर राहुरीत पुतळा विटंबन कुणी वेड्याने केले असे वाटत नाही, तर जाणीवपूर्व केल्याचे दिसत आहे. सरकारला लाज राहिली नाही अशी अवस्था आहे, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. दरम्यान आता प्राजक्त तनपुरेंचे अन्नत्याग उपोषण स्थगित झाले असून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय.