
१ मे रोजी लोकार्पण ?
राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने १ मे रोजी पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा असणार आहे. चबुतरा १० मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर ६० फूट उंचीचा शिवपुतळा आणि शिवपुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल २३ फूट उंचीची असणार आहे.