
२२ सेकंदाच्या व्हिडिओने खळबळ…
नवी मुंबईमधून एक धक्कादायक आणि हादरवणारी बातमी समोर आली आहे. पनवेल ते कल्याणला जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या NMMT च्या एसी बसमध्ये कपल शारीरिक संबंध ठेवतानाची धक्कादायक घटना समोर आली आहे.
२० वर्षीय कपलच्या व्हिडिओने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. बसच्या जवळून जाताना एका वाहनातून कपलच्या नको त्या अवस्थेतील व्हिडिओ शूट करण्यात आला. २२ सेकंदाचा व्हिडिओने सोशळ मीडियात धुमाकूळ घातला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी जोडप्याने कल्याणकडे जाणाऱ्या एनएमएमटीच्या एसी बसमध्येच शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ प्रवाशाने जवळच्या वाहनातून रेकॉर्ड केला. २२ सेकंदाच्या त्या व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय. हा व्हिडिओ नवी मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात बसच्या कंडक्टरवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला. कारण त्याने जोडप्याला थांबवण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेने कंडक्टरविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनर्जित चौहान यांनी ही बाब उजेडात आणली.
नवी मुंबई महानगर पालिकेची एसी बस पनवेल ते कल्याण या मार्गावर जात होती. बस पूर्णपणे रिकामी होती. वाहतूक कोंडीमुळे बसचा वेग कमी झाला. त्यावेळी जवळच्या वाहनातील व्यक्तीचे जोडप्याच्या कृतीकडे लक्ष गेले. त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करून महानगरपालिकेला पाठवला, अशी प्रतिक्रिया अनर्जित चौहान यांनी दिली.
तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी अशा अश्लील कृती करणे बेकायदेशीर आणि अस्वीकार्य आहे. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे नवी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले