
ठिकाणाचं नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल…
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यंदाच्या परीक्षेत 577 मुलं आणि 182 मुलींसह एकंदर 759 जणांची आयएएएस, आयपीएस, आयएफएस सह इतर सेवांसाठी निवड करण्यात आली आहे.
या परिक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी देखील चांगले यश मिळवले आहे. अशातच चर्चेत आले आहे ते पुण्यातील एक ठिकाण जिथं महाराष्ट्रातील लाखो मुलं UPSC, MPSC करण्यासाठी येतात. /e ठिकाणाचं नाव आणि येथे येण्याचे कारण जाणून शॉक व्हाल.
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुण्यात अनेक नामांकित विद्यापीठ आणि महाविद्यालये आहेत. त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी देखील अभ्यासासाठी पुण्यातच येतात. UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात सोईचे ठिकाण म्हणजे सदाशिव पेठ. पुण्याच्या सदाशिव पेठेतून फेरफटका मारताना जुने वाडे, जुन्या इमारती यांच्यासह लक्ष वेधून घेतात ते स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणाऱ्या संस्थांचे बोर्ड आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचे घोळके.
पुणे हे कायम शिक्षणाचं मुख्य केंद्र अआहे. मेडिकल, इंजिनियरींग प्रमाणेच आता पुणे UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आकर्षित करत आहेत. पुण्याची सदाशिव पेठ हे UPSC, MPSC परिक्षेचे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख केंद्र आहे.
बीड, लातुर, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, अमरावतीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी UPSC, MPSC परिक्षेची तयारी करण्यासाठी सदाशिव पेठेत येतात. UPSC, MPSC ची शिकवणारी घेणाऱ्या अनेक नामांकित संस्था सादशिव पेठेत आहेत. सदाशिव पेठेत फिरताना असा प्रकारचे क्लासेस मोठ्या संख्येने पहायला मिळतात.
यामुळेच सदाशिव पेठेत मोठी आर्थिक उलाढाल देखील होते. लाखो विद्यार्थी विविध क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. क्लासेस चालक विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेतात. लाखो विद्यार्थी UPSC, MPSC परीक्षेची तयारी करत असले तरी यातील फक्त हजारच्या आसपासच विद्यार्थी अधिकारी बनतात.
सदाशिव पेठेत UPSC, MPSC चा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे अनेकांना रोजगार मिळतो. मुलांची राहण्याची व्यवस्था, मेस असे अनेक व्यवसाय येथे चालतात. फक्त UPSC, MPSC चे क्लासेस घेणाऱ्या संस्थाच लाखो रुपयांची कमाई करत नाहीत तर यांच्यासह मुलांना रहाण्यासाठी PG चालवणारे, खानावळ इतकचं नाही तर सकाळी मुलांना चहा आणि नाश्ता विकणारे देखील बक्कळ कमाई करतात. एकूणच काय तर UPSC, MPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी येणाऱ्या लाखो मुलांमुळे सादशिव पेठेत कोट्यावधीची उलाढाल होते.