
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
सरपंच संदीप पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध बक्षीस वितरण
सावरदरी …स्मार्ट व्हिलेज सावरदरी गावचे लोकप्रिय विद्यमान सरपंच आणि सरपंच केसरी बैलगाडा शर्यतीचे मुख्य आयोजक श्री. संदीपभाऊ बाळासाहेब पवार यांनी महाराष्ट्र दिन आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१ मे, गुरुवार रोजी
“होम मिनिस्टर”अर्थातच हा खेळ पैठणीचा
या कार्यक्रमाचे महिलांसाठी आयोजन करण्यात आले होते. याचा उद्देश धकाधकीच्या आयुष्यात महिला भगिनींसाठी विरंगुळा आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजेत्या तसेच सर्व सहभागी महिला भगिनींना विविध आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. यात गृहिणी, कामगार, विद्यार्थिनी अशा अनेक महिलांनी हिरहिरीने भाग घेतला. आणि महिलांसाठी असा कार्यक्रम घेतल्याबद्दल श्री. संदीपभाऊ पवार यांचे आभार मानले.
वाढदिवस म्हणले की डोळ्यासमोर खर्च येतो आलीशान हॉटेलमध्ये जेवण पार्टी असा खर्च न करता अनाठायी खर्च नाही करता या ऐवजी उद्योग नगरीचे संदीपभाऊ पवार सरपंच यांनी गृहिणी आणि नोकरदार महिला विद्यार्थिनी यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विरंगुळ्याचे काही क्षण देण्याचा हा स्तुत्य उपक्रम घेतला हे खरेच कौतुकास्पद आहे.
विजेत्या महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या महिलेला इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आली.
त्याच प्रमाणे त्यानंतर येणाऱ्या महिलांना अनुक्रमे एलईडी टीव्ही, फ्रिज, कुलर , टेबल फॅन अशी आकर्षक बक्षिसे वितरित करण्यात आली.
सोडत पद्धतीने 5 भाग्यशाली महिला स्पर्धकांना मानाच्या पैठणी साड्या भेट देण्यात आल्या.
सहभागी प्रत्येक महिलेस भेटवस्तू देण्यात आल्या.
या वाढदिवसाच्या निमित्ताने खेड तालुक्यातील आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहिले. त्यांनी सरपंच संदीप पवार यांना त्यांच्या भावी राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम ग्रामस्थ सावरदरी आणि सरपंच संदीप भाऊ पवार मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सावरदरी व आजूबाजूच्या गावातील महिला आणि ग्रामस्थांनी या कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच इतक्या नेटक्या नियोजनासह झाल्याने लोकांचा उत्साह पाहायला मिळत होता.
पारंपरिक पद्धतीने सुवासिनींनी औक्षण करून तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. सरपंच संदीपभाऊ पवार यांनी यापूर्वी अतिशय भव्य आणि यशस्वी पद्धतीने सरपंच केसरी या बैलगाडा स्पर्धेचे आयोजन केले होते. गावातील विकासकामे, धार्मिक कार्यक्रम, यात्रा , उत्सव, सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवणे, वैद्यकीय मदत पुरवणे अशा कामांमध्ये सरपंच संदीप भाऊ पवार यांची भूमिका आग्रही असते. मनसेचा एका सामान्य कार्यकर्ता ते लोकप्रिय सरपंच असा संदीपभाऊ यांचा प्रवास थक्क करणारा आहे. असे कार्यकर्ते तयार व्हावेत आणि त्यांनी पुढे नेतृत्व स्वीकारून गावाला, तालुक्याला प्रगतीपथावर न्यावे ही लोक भावना आहे.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मंडळी ह. भ. प. श्री ज्ञानेश्वर महाराज दौंडकर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजयसिंह शिंदे पाटील तालुक्याचे युवा नेते मृगेशशेठ काळे मा सभपापती कैलास लिंभोरे चंद्रकांतदादा इंगवले, जिल्हा प्रमुख कैलास नरके,अमोल पानमद, खेड बारा असोसिएशन चे अध्यक्ष वैभव कर्वे, देविदास शिंदे, मनोज खराबी,तुषार बवले, विविध गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन बैलगाडा मालक आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्याचं काम सरपंच संदिपशेठ पवार यांच्या धर्मपत्नी सौ संतोषीताई संदिपशेठ पवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष शिंदे सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार श्री गोंधळजाई देवस्थानचे उपाध्यक्ष श्री मच्छिंद्र शेटे सर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन सरपंच संदिपशेठ बाळासाहेब पवार मित्रपरिवार साईसन उद्योग समूह यांच्या माध्यमातून करण्यात आले