
१३ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळाली; म्हणते- हे बाळ त्याचेच…
गुजरातमधील सुरत जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिला शिक्षिकेने तिच्याच विद्यार्थ्याला घेऊन पळ काढला. महिला शिक्षिकेचे वय २३ वर्षे आहे, तर विद्यार्थ्याचे वय फक्त १३ वर्षे आहे.
विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांनाही गुजरात-राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून अटक केली. तसेच ही महिला गर्भवती आहे. चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले आहे.
जेव्हा पोलिसांना कळले की शिक्षिका पाच महिन्यांची गर्भवती आहे. तेव्हा त्यांनी तिची चौकशी केली. शिक्षिकेने सांगितले की तिच्या पोटात वाढणारे मूल अल्पवयीन मुलाचे होते. आता हे शोधण्यासाठी पोलीस डीएनए चाचणी करतील. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच सुरत जिल्ह्यात, एक २३ वर्षीय महिला शिक्षिका तिच्या १३ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षकावर मुलाचे अपहरण केल्याचा आरोप केला. पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून दोघांचा शोध सुरू केला. गेल्या गुरुवारी, पोलिसांनी दोघांनाही अरावली जिल्ह्यातील गुजरात-राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून अटक केली. पोलिसांनी दोघांनाही सुरतला नेले. पोलीस चौकशीदरम्यान, महिला शिक्षिकेने सांगितले की ती विद्यार्थ्यासोबत सुरतहून अहमदाबादला गेली होती. मग अहमदाबादहून ते दिल्ली, वृंदावन आणि जयपूरला गेले.
जयपूरहून परतत असताना पोलिसांनी दोघांनाही शामलाजी सीमेवर पकडले. विद्यार्थ्याच्या वडिलांनी महिला शिक्षिकेवर त्यांच्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप केला. तपासादरम्यान, पोलिसांना कळले की, महिला शिक्षिका गर्भवती आहे. पोलिसांनी महिला शिक्षिकेला पोटात वाढणाऱ्या बाळाबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की ते मूल अल्पवयीन मुलाचे आहे.
हे कळताच पोलिसांना धक्का बसला. महिला शिक्षिकेच्या दाव्याबाबत डीएनए चाचणी केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याला त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले आहे, तर महिला शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला शिक्षिका विद्यार्थ्याला घेऊन जाताना दिसत आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांना असा संशय आहे की शिक्षक आपल्या विद्यार्थ्याकडे खूप आकर्षित झाला होता. ती त्याला तीन वर्षांपासून शिकवत होती.