
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
धनकवडी,पुणे : पुण्यनगरीचे शक्तीपीठ आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराजांचा ७८ वा समाधी सोहळा मोठ्या दिमाखात, उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दिवसभर भक्तांच्या अलोट गर्दीने परिसर फुलून गेला आहे. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने मागील सात दिवसांपासून समाधी सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक,सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सद्गुरू शंकर महाराजांच्या ७८ वा समाधी सोहळ्यातील मुख्य दुर्गाष्टीमीच्या पुजेची सुरूवात पहाटे दोन वाजता विश्वस्तांच्या हस्ते समाधी स्नान व पुजाने सपंन्न झाली. महाराजांच्या दर्शनासाठी रात्री १२ पासून भक्तांनी रांगा लावल्या होत्या पहाटे ४.३० पासून समाधी दर्शन सुरू झाले, सांयकाळी मठामध्ये समाधीस पालखी सोहळ्याच्या तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या यावेळी भजनाच्या गजरात भक्तांनी आनंद लुटला.
संपुर्ण दिवस महाप्रसादाचे वाटप सुरू होते. दर महिन्याच्या दुर्गाष्टमी रक्तदान शिबीरास चार वर्षे पुर्ण झाली. रक्तदान शिबीरातही भक्तांचा ऊत्सफुर्त प्रतीसाद लाभला. दिनांक ६ मे रोजी काल्याच्या किर्तनानंतर मठ महाराजांच्या विश्रांतीसाठी भाविकांना दर्शनासाठी सकाळी ११ नंतर पुर्ण दिवस बंद राहील व ७ मे रोजी सकाळी नेहमी प्रमाणे सुरू होईल असे विश्वस्तांनी सांगितले.
समाधी सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
यंदा समाधी सोहळ्यात अनेक मान्यवरांनी आरती सेवा व दर्शन घेऊन हजेरी दिली. यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार निलम गोऱ्ऱ्हे, भिमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने आदिंचा सहभाग होता.