
चवताळलेला मसूद अजहर काय काय म्हणाला ?
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केला.
या मोहीमेला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले होते. यामध्ये पीओकेमधील 9 दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करुन उद्ध्वस्त करण्यात आले. यापैकी एका दहशतवादी तळावर कुख्यात दहशतवादी मसूद अजहर याचे कुटुंबीयही होते. यापैकी 14 जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. यामध्ये मसूद अजहरची (masood azhar) आई आणि बहिणीचा समावेश होता. यामुळे भारतातील अनेक निष्पाप लोकांचे जीव घेणारा मसूद अजहर शोकसागरात बुडाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मसूद अजहरने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
अल्लाह तालाचे काही खास लोक असतात… जे शहीद होतात ते म्हणजे अल्लाहचे पाहुणे बनतात. माझ्या कुटुंबातील पाच जणांना ही खास संधी मिळाली… रात्रीच्या वेळी त्यांना ही शहादत मिळाली. पाच निष्पाप लहान मुलं, माझी आई जी खूप आजारी होती, माझे वडील, माझी बहीण आणि तिचा पती – सगळे या अपघातात शहीद झाले.
माझ्या आईला कॅन्सर होता. ती अनेक दिवस आजारी होती. तिने मला सांगितलं होतं की, “माझ्या मृत्यूनंतर मला तुमच्या वडिलांजवळ दफन करा.” आणि आश्चर्य म्हणजे ती आपल्या पतीजवळच दफन झाली, दोन महिने अगोदरच. हे खूप मोठं नशीब होतं.
एका अनुभवी माणसाने सांगितलं की, “हे निष्पाप मुलं, आई-वडील, बुजुर्ग लोक – हे सगळे खास होते. त्यांचा मृत्यू अचानक झाला पण त्यांच्या नशिबात हे लिहिलं होतं. त्यांचं शहीद होणं ही मोठी गोष्ट आहे. अल्लाहने त्यांना आपले पाहुणे बनवले.”
हे “चौधरी” नावाचं कुटुंब तीन वर्षांपासून हजला जायचा प्रयत्न करत होतं. व्हिसा मिळत नव्हता. पण यावेळी त्यांना व्हिसा मिळाला आणि संपूर्ण कुटुंब हजसाठी गेलं. आणि अल्लाहच्या घरात पोहोचल्यावर त्यांचा मृत्यू झाला. ही खूप मोठी गोष्ट आहे. अशी वेळ खूप कमी लोकांच्या नशिबात येते.
“मोत्वी” नावाच्या व्यक्तीने सांगितलं – हा अपघात, हे बलिदान संपूर्ण जगासाठी एक मोठा धडा आहे. शहीद झालेल्यांचा त्याग, त्यांचं बलिदान – हे सगळं इतिहासात कायम राहणार आहे.
आज त्यांच्या जनाजाची (अंत्यविधीची) नमाज हरम शरीफमध्ये होणार आहे. ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. ईमान, पश्चात्ताप आणि माफी मागण्याची अशी संधी फार थोड्यांना मिळते…