
‘या’ जिल्ह्यांना पुढचे 24 तास महत्त्वाचे ; हवामान विभागाचा अंदाज !
राज्यात मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच वातावरणात बदल झालाय. ढगाळ हवामान अन् वादळी पावसामुळे तापमानात घट झाल्याचं जाणवतंय.
तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन् विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा थैमान काल पाहायला मिळालं. तर दुसरीकडे तापमानामधील चढ – उतार देखील कायम राहणार (Rain) असल्याची शक्यता आहे. अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याची माहिती आयएमडीने दिला आहे
वादळी पाऊस आणि गारपिटीने राज्यात बुधवारी अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आजसाठी देखील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर आणि पुणे, तसेच मराठवाड्यातील परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये काल पावसाची नोंद झाली आहे.
आज ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
आज 8 मे रोजी कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि नांदेड, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या चार दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी दुपारी उकाडा अन् रात्रीच्या वेळी पाऊस, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. आज देखील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. तर पुढील अजून काही दिवस आता अशीच स्थिती कायम राहणार असल्याचं समजतंय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबईमध्ये आज संध्याकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर पुण्यामध्ये 8 मे रोजी दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे.संध्याकाळी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असा आयएमडीचा अंदाज आहे. हवामान विभागाने म्हटलंय की, नाशिकमध्येही पाऊस हजेरी लावेल. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासन केलं आहे.