
दैनिक चालु वार्ता रत्नागिरी प्रतिनीधी – समिर शिरवडकर.
राजापूर:- ( होळी) :- ग्रामपंचायत दळे महसूल गाव होळी मधील पाण्याचा प्रश्न न्यायालयीन दरबारी असतानाच, होळी मधील त्याच विहिरीवरील लोकांना पाणी मिळण्यासाठी शासनाचे लाखो-करोडो रुपये खर्च केलेला आज मात्र पाण्यात गेलेल्या आहे असे म्हटले तर वावग ठरणार नाही. सरकार मात्र पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतत असतो,तर दुसरीकडे मात्र काही टक्केवारी साठी आणि संपूर्ण मलिदा खाण्यासाठी जणू जाही याच पाण्यात हात धुऊन घेताना ठेकेदार, सरपंच, आणि पाणी पुरवठा अधिकारी दिसत आहे,याचे प्रत्येय होळी नळ पाणी सडेवाडी योजन मध्ये आलेले दिसतो.
होळी न.पा. पु.सडेवाडी योजना ही विहीर मुळात जैतापूर आरोग्य विभाग जैतापूर साठी स्थानिक ग्रामस्थांनी विनामोबदला जागा देऊन हॉस्पिटल साठी पाणी मिळाव यासाठी सढळ हस्ते दिली .तो योजना नाबार्ड मधून २० लक्ष निधी च्या माध्यमातून कार्यन्वित झाली.परंतु ती आज पर्यत पुर्ण झालीच नाही, या उलट त्याच विहिरीतून सरपंच दळे यांनी याच विहीरी चा वापर राष्टीय पेय जल योजना साठी १६ लक्ष निधी वापरून केला.त्याच जुन्या खड्ड्यात जुन्या पाइपलाइन चा वापर करून योजना सुरू केली.याच विहीरी च्या साठवणी टाकी ची उंची वाढविण्यासाठी अनुक्रमे २ लक्ष आणि त्यानंतर १.५० लक्ष असा निधी वापरला गेला.याचा विहीरी सभोवताली संरक्षण भिंतीसाठी ५ लक्ष निधी सरकारने दिला.अजून काही दुरुस्तीच्या कामासाठी १४ व वित्त अयोग च्या माध्यमातून १ लक्ष असा निधी देण्यात आला होता.शासनाच्या जल जीवन योजनेसाठी २७ लक्ष निधी सुध्दा याच विहिरीसाठी आल्याचं समजते.
अश्या,प्रकारे करोडो खर्च करून शासनाच्या पैशाचा अपव्यय झालेच दिसून येत,काही अखेरी चे दिवस वगळता हे पाणी पिण्या योग्य असल्याचे दाखले सुद्धा पाणी पुरवठा विभागाकडे आहेत, मग हो विहीर पुन्हा का कार्यन्वित होत नाही,सरपंच दळे च्या हट्टापायी आणि शासनाच्या करोडो रुपये राजापूर पाणीपुरवठा विभागाने का वाया घालवले? असा प्रश्न सुद्धा पडल्याशिवाय रहात नाही,फक्त आणि फक्त टक्केवारी साठीच हा अट्टहास का? आमच्या कारातील पैसा का वाया जातो याचा जाब आम्ही विचारल्याशिय स्वस्थ बसणार नाही.एक मात्र नक्की सरपंच साहेब याच गावातील असून होळी वासी पाण्यापासून वंचित कसे?एवढा पैसा गेला कुठे? असा प्रश्न निर्माण होतो. या योजनेच्या खर्चा विषयीं सखोल चौकशी होऊन, ती विहीर पुन्हा कार्यन्वित करून पून्हा एकदा सडेवाडी साठी चालु करून सरपंच यांच्या गावातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या लाभार्थी ना पाणी मिळावे अशी मागणी होत आहे.