
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी – रवि राठोड
पालघर : दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने पालघर डहाणू तलासरी सह सबंध पालघर जिल्ह्यातील शेतकरी बागायतदार मच्छिमार बोटी वीट भट्टी तसेच घरांची खूप मोठे नुकसान झाले असून या सर्व स्तरातील नुकसानग्रस्त वर्गाचे महसूल अधिकारी यांनी ग्रामपंचायत व्यवस्थापनाला सोबत घेऊन पंचनामे करून मदत मिळण्यासंदर्भातली कार्यवाही करावी याकरिता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जिल्हास्तरीय शिष्टमंडळाने जिल्ह्याधिकारी इंदूराणी जाखर यांची भेट घेऊन चर्चा केली व कारवाई करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी इंदूराणी जाखर यांनी पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.