
एस जयशंकर यांची अमेरिकेशी चर्चा…
भारताने पाकिस्तानच्या लाहोरवर ड्रोन हल्ला केला आहे. शिवाय, तीन पाकिस्तानी लढाऊ जेटही पाडली गेली आहेत. याशिवाय, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याशी चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पूंछमध्ये दाखल
पाकिस्तानकडून हल्ले सुरू झाल्यानंतर भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे स्वत: पूंछमध्ये दाखल असून, सीडीएस आणि तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे.
भारताने पाकिस्तानचं लढाऊ जेट पाडलं
भारताने पाकिस्तानचं एफ-१६ हे लढाऊ विमान पाडलं. याशिवाय पाकिस्तानचे आठ ड्रोनही पाडले असून, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये ब्लॅकआउट केलं आहे.
पाकिस्तानकडून जम्मूत ड्रोन हल्ले
बिथरलेल्या पाकिस्तानकडून जम्मूत ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत, मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचे आठ ड्रोन हाणून पडले आहेत.
ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू : संरक्षण मंत्री
पहलगाम हल्ल्याचा भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर स्ट्राईक करून बदला घेतला आहे. त्या माेहिमेला भारतीय लष्काराने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले आहे. त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्काराने नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. ते ऑपेरशन सिंदूर अजूनही सुरू आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
सुप्रिया सुळे अन् अजित पवार यांनी निर्णय घ्यायचा आहे : मुनगंटीवार
सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्र येऊन महायुतीमध्ये येत असतील तर कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करत असू तर त्यात महाराष्ट्राचे हितच आहे. त्यातून महाराष्ट्र वेगाने प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकतो, त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांना बाप बदलण्याची सवय आहे : संजय शिरसाट
संजय राऊत यांचा बाप नेमका कोणता, हेच कळायला मार्ग नाही. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला विकण्याचा प्रयत्न केला. शिवसेनाप्रमुख हे काँग्रेससोबत कधीही जाणार नाही, असे सांगत होते. पण ते काँग्रेसोबत गेले. त्यांनी पहिल्यांदा बाप बदलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ते शरद पवारांना बाप मानायला लागले. पवारांनी कंबरड्यात लाथ मारल्यानंतर राहुल गांधींना बाप मानणण्यासाठी ते काश्मीरपर्यंत गेले. त्यामुळे बाप बदलण्याची सवय संजय राऊत यांना आहे, असा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी खासदार राऊत यांना लगावला.
पाकिस्तानसोबतचा अनुभव चांगला नाही : विक्रम मिस्त्री
भारताने उरी, पठाणकोट हल्ल्याचे पुरावे देऊन पाकिस्तानकडे कारवाई करण्याची मागणी केली हेाती. पण, पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाही, त्यांच्यासोबतचा अनुभव चांगला नाही. आपण दिलेल्या पुराव्यांचा वापर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या बचावासाठी करण्यात आला. भारताने काल केलेला स्ट्राईक हा केवळ दहशतवाद्यांच्या तळावर करण्यात आलेला आहे. पण, पाक लष्काराचे अधिकारी दहशतावाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण
कराचीजवळ भारतीय लष्करी कारवाईच्या अफवांनंतर गुरुवारी पाकिस्तानचा शेअर बाजार सहा टक्क्यांहून अधिक घसरला आणि तासभर व्यापार थांबवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. व्यवहार थांबवण्यापूर्वी KSE100 निर्देशांक 6,948.73 अंकांनी किंवा 6.32 टक्क्यांनी घसरून 1,03,060.30 वर आला. भू-राजकीय परिस्थितीमुळे गुंतवणूकदार घाबरत असल्याने परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असेही म्हटलं जात आहे. 2021 नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.
शरद पवार मोठे नेते, त्यांना शुभेच्छा अन् त्यांचे स्वागत
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे मोठे नेते, आहेत. त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत असेल. त्यांच्या अनुभवाचा राज्य सरकारला फायदा होईल असे प्रताप सरनाईक म्हणाले. शरद पवार आता नवीन नेतृत्वाच्या हाती सत्ता देऊ पाहत आहेत. नव्या नेतृत्वाला संधी देऊ पाहत आहेत. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर वाढणारा तणाव पाहता भारताने अमेरिका आणि चीनसह प्रमुख देशांशी राजनैतिक संपर्क वाढवला आहे .राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल,परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी त्यांच्या अनेक समक्ष आणि परदेशी राजदूतांशी चर्चा केली आहे.
एचक्यू 9 एअर डिफेन्स सिस्टीम बेचिराख, भारताला रान मोकळं
पाकिस्तानने चीनची एचक्यू 9 ही एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केली होती, ती भारताने हल्ला करून बेचिराख करून टाकली. त्यामुळे लाहोर या महत्त्वाच्या शहरावरचं हवाई छत्रच नष्ट झालं आहे. भारताच्या या कारवाईमुळे भारताला लाहोरपर्यंत मोकळं रान मिळालं आहे. आता भारतीय विमानं लाहोरपर्यंत पोहोचली तरी रडारवर त्यांचा माग काढणे शक्य होणार नाही.
पाकिस्तान सोडण्यास तयार राहा, अमेरिकेचे नागरिकांना आवाहन
अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी लाहोरमध्ये कुठेही फिरू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लाहोरच्या विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर हा रिकामा केला जाऊ शकतो असंही अमेरिकेने सांगितलं आहे. पाकिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी प्लॅन तयार करा, सर्व आवश्यक कागदपत्रं तयार ठेवा असंही अमेरिकेने सांगितलं आहे. कुणाच्याही मदतीच्या भरवशावर थांबू नका. स्थानिक माध्यमांतील बातम्यांवर लक्ष ठेवा असंही सांगण्यात आलं आहे.
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त! 12 ठिकाणी स्फोट, ड्रोन हल्ले
पाकिस्तानातील सहा शहारातील 12 ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानने दावा केला आहे की भारताने त्यांच्या हवाई क्षेत्रात 25 ड्रोन पाठवून हे हल्ले केले आहेत. गुजरनवाल, रावळपिंडी, कराची, लाहोर येथे झालेल्या स्फोटात चार जखमी जखमी तर एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पाकिस्तानचा भारताच्या 15 लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न
पाकने भारतातील उत्तर आणि पश्चिम भारतातील 15 लष्करी तळांवर ड्रोन आणि मिसाईलचा वापर करून हल्ले करण्याचा प्रय़त्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसहर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगढ, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज या लष्करी तळांचा समावेश आहे.
100 दहशतवाद्यांचा खात्मा
ऑपरेशन सिंदूरनंतर आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या ऑपरेशनमध्ये १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती दिली. तसेच ऑपरेशन सिंदूर अजून संपले नसल्याचेही त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित नेत्यांना सांगितल्याचे समजते.
सर्वपक्षीय बैठक संपली
ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक संपली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. सरकारने घेतलेल्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचे खर्गे यांनी बैठकीनंतर मीडियाशी बोलताना सांगितले.
नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक
तेलंगणामध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये आज सकाळी जोरदार चकमक झाली. या चकमकीमध्ये पाच पोलिस शहीद झाले आहेत. तसेच सुरक्षा यंत्रणांनी ८ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पुढील वर्षभरात देशातून नक्षलवादचे समूळ उच्चाटन करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार नक्षलग्रस्त भागात नक्षलींच्या शोधासाठी मोहिम राबविली जात आहे.
सीमाभागातील नागरिकांचे स्थलांतर सुरु
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या कुरापती काही थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवर सतत गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानकडून युद्धकराराचे उल्लघंन सातत्याने केले जात आहे. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारत १३ भारतीयांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. सीमाभागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
लाहोरमध्ये 3 स्फोट, विमानतळ बंद
पाकिस्तानातील लाहोरमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. लाहोर शहर हादरलं असून 3 स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटांनंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आले आहे.
भारत-पाक तणावामुळे सोनं 1 लाखांवर पोहचणार
गेल्या महिन्यात 22 एप्रिलला प्रतितोळा सोन्याची किंमत 1 लाखांवर पोहोचली होती. आता पुन्हा एकदा सोने जीएसटीसह लाखावर गेले आहे. वर्षाच्या शेवटी सोन्याचे दर प्रतितोळा 1 लाख 10 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान युध्द परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. सोन्याचे दर जीएसटीसह पुन्हा लाखावर गेले आहेत. सलग दोन दिवस सोन्याचा दरात वाढ. झाली आहे. सोने 1 लाख 10 हजारांवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोने प्रतितोळा 97 हजार 200 रुपयांवर गेले आहे.
भारताच्या हल्ल्यात 37 पाकिस्तानी नागरिक मारले गेले – शहाबाज शरीफ
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्ताने 37 नागरिक मारल्याचा आणि 40 जण जखमी झाल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी म्हटले आहे. भारतीय लष्कराकडून आंतकवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आल्याचे म्हटले आहे.
शिवसेना चिन्हा आणि पक्षावर सुनावणी उन्हाळी सुट्यांमध्ये
शिवसेना चिन्हा आणि पक्षाच्या संदर्भात सुनाणी उन्हाळी सुट्टांमध्ये घेणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी लवकर घेण्याची विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली होती.
ऑपरेशन सिंदूरनंतर नऊ शहरातील विमानतळ बंद
ऑपरेशन सिंदूरनंतर 10 मेपर्यंत देशातील नऊ विमानतळं बंद राहणार आहेत. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. एअर इंडियाने 10 मेपर्यंत नऊ शहरांमधील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. विमानतळ बंद असलेल्या शहरांमध्ये जम्मू काश्मीर, जोधपूर,अमृतसर, चंदीगड, राजकोट, भुज, श्रीनगर, लेह, जामनगर यांचा समावेश आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर आज सर्वपक्षीय बैठक
लष्कराने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. त्यानंतर आज (ता.8) कारवाईची माहिती देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षांच्या गटनेत्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.