
भारतही अलर्ट; शाळा बंद,सुट्ट्या रद्द, 8 हजार ट्विटर अकांऊट…
ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून 7 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्यानं भारतानं सीमारेषेच्या आत घुसून पाकिस्तानला करारा जवाब दिला आहे. भारतानं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह कराची, लाहोर, रावळपिंडी, पेशावरसह प्रमुख शहरांवर मोठा हल्ला केला आहे.
भारतीय सैन्य (Indian Army) पाकिस्तानला ‘सळो की पळो’ करून सोडलं आहे. यातच आता पाकिस्तानमध्ये मोठी कारवाई केली जात असतानाच भारताकडूनही देशभरात प्रचंड अलर्ट जारी करत काही प्रमुख निर्णय घेतले आहेत.
पाकिस्ताननं मिसाईल आणि ड्रोनचा आक्रमक मारा पाहून अखेर संपूर्ण देशात ब्लॅक आऊट जाहीर केला आहे. तर भारताकडून(India Vs Pakistan) सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट केला आहे. पंजाब,अंबाला,राजस्थान आणि हरियाणातील गावांना ब्लॅक आऊट करण्यास सांगितलं आहे. तसेच या परिसरात सायरनचा आवाज आल्यानंतर तात्काळ प्रतिसाद देऊन ब्लॅकआऊट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारनं अशातच पंजाब, हरियाणा,गुजरात,राजस्थान आणि पश्चिम बंगालबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या ठिकाणच्या सरकारी अधिकारी,पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच या भागातील शाळांना पुढील आदेशापर्यंत सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
तसेच भारतानं पाकिस्तानकडून युद्धाच्याबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जाऊ नये,चुकीची माहिती दिली जाऊ नये म्हणून मोठी खबरदारी घेतली आहे. भारतानं एकूण 8 हजार ट्विटर खाते बंद करण्यात आले आहेत. हे सर्व अकाऊंट पुढील आदेश येईलपर्यंत ही खाती बंद राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भारतानं आता देशातील एकूण 27 विमानतळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थाही वाढवली आहे. पाकिस्तानकडून विमानतळे बंद करण्याचा आदेश दिला आहे. दोन्ही देशातील विमानतळांवर विमानांची प्रचंड गर्दी झाल्याची माहिती समोर येत आहे.
एकीकडे भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई सुरू केली असतानाच महाराष्ट्र सरकारनेही युध्दासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे. तसेच मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.तसेच पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.