
27 विमानतळ बंद; 400 उड्डाणे रद्द वाचा कोणते एअरपोर्ट राहणार बंद…
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळ नष्ट करुन ऑपरेशन सिंदूरद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे.
आज पहाटे पाकिस्तानकडून मिसाईलचा मारा झाल्याचे वृत्त समोर आले. आता भारताने सुरक्षेची पाऊले उचलली आहेत.
वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, ऑपरेशन सिंदूर नंतर भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील जवळजवळ सर्व प्रमुख शहरांमध्ये पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सुरक्षेचा उपाय म्हणून, देशभरातील 27 विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. ही विमानतळे शनिवारी 10 मे सकाळी 5.29 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
भारतात 430 विमान उड्डाणं रद्द
भारतीय विमान कंपन्यांनी गुरुवारी 8 मे 2025 पासून एकूण 430 उड्डाणे रद्द केली आहेत. हे भारतातील एकूण नियोजित उड्डाणांच्या 3 टक्के आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानच्या संभाव्य लष्करी हालचाली पाहता सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
हे विमानतळ बंद करण्यात आले?
चंदीगड
श्रीनगर
अमृतसर
लुधियाना
भुंतर
किशनगढ
पटियाला
शिमला
गग्गल
बठिंडा
जैसलमेर
जोधपूर
बिकानेर
हलवारा
पठाणकोट
लेह
जम्मू
मुंद्रा
जामनगर
राजकोट
पोरबंदर
कांडला
केशोड
भुज
धर्मशाळा
ग्वाल्हेर
हिंडन (गाझियाबाद)
मुंबईसह या विमानतळावर सुरक्षेत वाढ
सिंदूर ऑपरेशननंतर इंदिरा गांधी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी महत्वाचा सल्ला
उड्डाण रद्द झाल्यानंतर, सर्व विमानतळांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता प्रवास करु नये.
ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत किंवा त्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, त्यांना संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.
दिल्ली विमानतळाने प्रवाशांना सूचना जारी करून सांगितले की, दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल्स आणि चारही धावपट्ट्यांवर सर्व कामकाज सामान्यपणे सुरू आहे. तथापि, बदलत्या हवाई परिस्थितीमुळे काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सचिवांशी उच्चस्तरीय बैठक
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अलिकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तयारी आणि आंतर-मंत्रालयीन समन्वयाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी आज भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत कार्यात्मक सातत्य आणि संस्थात्मक लवचिकता राखण्यासाठी मंत्रालये आणि एजन्सींमध्ये अखंड समन्वयाची गरज पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.
बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये नागरी संरक्षण यंत्रणा मजबूत करणे, चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करणे यांचा समावेश होता. राज्य अधिकाऱ्यांशी आणि जमिनीवरील संस्थांशी जवळून समन्वय राखण्याचा सल्लाही मंत्रालयांना देण्यात आला. देश संवेदनशील काळातून जात असताना पंतप्रधानांनी सतत सतर्कता, संस्थात्मक समन्वय आणि स्पष्ट संवाद साधण्याचे आवाहन केले. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, ऑपरेशनल तयारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, असे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.