
कोणत्याही कुटुंबाची तक्रार आली तर ती सामोपचाराने मिटवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण कुटुंब समाजाचा पाया आहे. कुटंब एकत्र आणण्यासाठी कुटुंबात संवाद घडवून आणणं, गैरसमज दूर करणं, यासाठी कायद्याच्या तरतुदीतील तीन काऊन्सिलिंग होणं गरजेच असतं” असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या.
त्या आज जनसुनावणी घेण्यासाठी आल्या आहेत. कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण आरोपपत्र दाखल करताना कोणामुळे दिरंगाई झाली? यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
जिल्ह्यात महिला केंद्र असतात. लोकांचा गैरसमज होतो, त्यांना हा आयोग आहे असं वाटतं. त्या तक्रारी त्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या असतात असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. “परिणय फुकेंसंदर्भात कोणतीही तक्रार आयोगाला मिळालेली नाही. मीडियामधून आम्हाला त्या संदर्भात जे व्हिडिओ मिळाले, त्यावर नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तुम्ही काय केलय ते कळवा असं सांगितलं. आयोगातून संबंधित पीडित महिलेला चार ते पाचवेळा फोन केला. ज्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत, त्याची माहिती असण्याचं कारण नाही. तक्रारदाराने पाठपुरावा जरुर करावा, तुम्हाला न्याया देण्यासाठी आम्ही बांधिल, कटिबद्ध आहोत असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
कुटुंब व्यवस्था हा समाजाचा पाया
आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे. कोणीतही तक्रार देताना स्थानिक पोलीस स्टेशनला द्या. त्यानंतर बरोसा सेल आणि कौटुंबिक संरक्षण न्यायालयात तक्रार द्या, तिथे न्याय मिळाला नाही, तर महिला आयोग आहेच असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. कुटुंब व्यवस्था हा समाजाचा पाया आहे. कुटुंबासंदर्भात कोणतीही तक्रार आली, तर लगेच टोकाची भूमिका घेता येत नाही. न्यायप्रकिया कुटुंब एकत्र करण्यावर भर देते. जोडणं हे काम आहे, तोडणं नाही असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्यांच्या स्वत:च्या राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाल्या की,पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो, राजीनामा मागणं ही विरोधकांची भूमिकाच असते.