
संजय राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला !
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी राज्यभर चर्चा सुरू आहे. दोन पवार एकत्र येण्याला कुणाचा खोडा आहे यावर काल संजय राऊतांनी भाष्य केले. त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर खापर फोडले.
तर आज त्यांनी राऊतांनी शरद पवार हे भाजपासोबत जातील का याविषयी थेट मत व्यक्त केले आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत जळगाव जिल्ह्यापासून संजय राऊत यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून या ठिकाणी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बैठक घेत आहेत.
संजय राऊतांचे भाष्य काय ?
शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील, ते भाजपासोबत जातील का या प्रश्नावर पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी उत्तर दिले. बरोबर आहे या ज्या चर्चा आहेत त्या हवेत आहेत, असे ते म्हणाले. मी स्वत: या मताशी ठाम आहे की, शरद पवार हे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेने चालतात. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा शरद पवार राज्यात आणि देशात चालवत आहेत. धर्मांध आणि ज्या जातीय शक्ती या राज्यात वाढलेले आहेत. त्यांच्यासोबत शरद पवार यांच्यासारखा नेता, जो आमचा आदर्श नेता आहे, तो जाईल, असं त्यांच्या सहकाऱ्यांना आणि आमच्यासारख्या चाहत्यांना वाटत नाही, असे मत राऊतांनी व्यक्त केले.
ते अमित शाह यांची भाषा बोलत आहेत
हिंदी भाषा महाराष्ट्राची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे, असे वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले होते. त्याचा समाचार राऊतांनी आज घेतला. मराठी माणसाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी, त्याला मराठी माणूस म्हणून स्वाभिमानाने जगताप यावं यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. आणि हेच लोक आता म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत. त्यांच्या नेत्यांना विचारा की त्यांची भूमिका आहे का? मराठी मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? त्यांचा जो विचार आहे तो हा भाजपचा विचार आहे हा अमित शहांचा विचार आहे. मी वारंवार सांगतो त्यांच्या पक्षाचे नेते आणि प्रमुख अमित शाह आहेत. त्यामुळे शाह हे जे बोलतात, तेच हे लोक बोलतात असा टोला राऊतांनी लगावला.
गुलाबराव पाटलांवर खोचक टीका
यावेळी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानावर फटकेबाजी केली. जे कोणी म्हणताय ते नक्कीच महाराष्ट्रामध्ये कच्चे आहेत. तुम्हाला जे यश मिळालं ते सरळ मार्गाने मिळालेले नाहीत. तुम्ही जे जिंकलात ते लोकांना मान्य नाहीये, असा टोला त्यांनी मंत्री पाटील यांना लगावला. जिल्ह्यात पालकमंत्री असताना महिलांना रस्त्यावर प्रसूती होण्याची वेळ येते. रुग्णवाहिका मिळत नाही उपचार मिळत नाही. मंत्री म्हणून तुम्ही राज्यात मिरवतात, राज्याचं तोंड काळ करण्याचाच काम तुम्ही करत आहेत. राऊतांच्या जळगावच्या दौर्यावर टीका करताना गुलाबराव पाटील यांनी ते तोंड काळ करून जातील असं म्हटलं होतं, त्याचा समाचार राऊतांनी घेतला.
आम्ही अनिल गोटे यांच्यासोबत
धुळे येथील शासकीय विश्रामगृह येथे कोट्यवधींचे घबाड सापडले होते. त्याप्रकरणात ठाकरे शिवसेना ही अनिल गोटे यांच्यासोबत असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलमध्ये टाकू असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी कोणावर गुन्हे दाखल केले.एसआयटी नेमकी कोणाच्या नेतृत्वात नियुक्ती केले याची माहिती दिली आहे का, असा सवाल राऊतांनी केला.