
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- श्री संत गाडगे महाराज शिक्षण संस्था कलंबर बुद्रुक तालुका लोहा संचलित संत गाडगे महाराज मागासवर्गीय हायस्कूलचे सेवक श्री नंदकिशोर झामसिंह मरमठ हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने हायस्कूल व गावकऱ्यांच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमात मरमठ यांचा सहपत्नीक आहेर स्वरुपी भेट वस्तू देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक जी. ,आर. बेद्रे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मुकेश सिंह सुरज सिंह गौतम , श्रीमती गजराबाई सुरज सिंह गौतम ( संस्थेच्या सचिव) , मनुसिंह ठाकूर सरपंच, बालाजी परदेशी ( मा. जि.प.सदस्य) , कैलास मेहर ( मा.ग्रा.प. सदस्य) , शरद अप्पा मुक्कनवार , बापुराव अप्पा मुक्कनवार, पत्रकार नामदेव तारू , पिंठु मरमठ , सतिश मानेलू , उज्वल गौर , यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेची पूजन व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संत गाडगे महाराज मागासवर्गीय हायस्कूलच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक बेंद्रे म्हणाले की , शासनाची नोकरी असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार निवृत्त व्हावे लागते , मरमठ यांचा स्वभाव हा शांत व मनमिळावू , स्वभाव ,धार्मिक वृत्ती व अभ्यासू सेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते . मरमठ हे विद्यार्थ्यांची माऊली होते. गेल्या ३०वर्षापासून हायस्कूलमध्ये तन ,मन लावून सेवा केली. त्यांची सेवा ही आम्हाला कमतरता भासणार आहे. कोणावर ही नाराज न होता सांगितलेले काम हासत हासत कामे केली. असे मत व्यक्त केले. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी हायस्कूलचे सहशिक्षक वाघमारे सर , गुणावंत सर , जाधव मॅडम , जीगळे सर , कांबळे सर ,गोरे सर , कोकणे सर , मोकले सर . मैलारे सर, सेवक आगलावे तुकाराम , शेंदारकर यांनी परिश्रम घेतले यावेळी गावातील शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी वडजे यांनी केले.