दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड :भारत टॅलेंट सर्च परीक्षेचा पेपर वैद्यराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अंबड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाचेगाव अशा दोन केंद्रावर झाला होता. या परीक्षेमध्ये हस्तपोखरी, मसई, दूधपुरी,ढालसखेडा, माळीवाडी,बाचेगाव, सिद्धेश्वर पिंपळगाव , रवना ,भालगाव, झिरपी, दाढेगाव, बारसवाडा , पारनेर तांडा , वडीकाळ्या आदी शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते, त्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मत्स्योदरी स्पर्धा परीक्षा केंद्र अंबड येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी रामेश्वरजी मुळक, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवव्याख्याते गणेश गिरी सर, गोकुळ राजपूत, प्रमुख पाहुणे जालना सायबर सेलचे पोलीस अधिकारी योगेश चव्हाण, वैद्यराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत जायभाय, साठे कोचिंग क्लासेसचे संचालक महेश साठे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रामेश्वरजी मुळक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे व्याख्यान दिले असून अनेक गरिबी तून कलेक्टर, पोलीस अधीक्षक, झालेल्या अधिकाऱ्याचे उदाहरणे दिली असून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच सायबर सेलचे पोलीस अधिकारी योगेश चव्हाण यांनी मोबाईल मधील अनेक ॲप विषयी माहिती सांगितली असून आपला मोबाईल व्यवस्थित रित्या हाताळला गेला नाही तर त्याचे काय परिणाम होतात हे समजावून सांगितले.
यावेळी आयोजक नितीन रोहोकले, दत्तात्रय धुमाळ, दिलीप तौर, योगशिक्षक गजानन पांडुरंग पुरी, सुधाकर खाडे सर , दत्तात्रय शिंदे सर, बहिर सर, दोरखे सर, शशिकांत कावळे सर , वाघ सर, सानप सर, लांडगे मॅडम , सय्यद मॅडम , निवृत्ती शिंदे सर ,प्रकाश कवडे सर , पालवे सर , नितीन कोल्हे सर, हर्षे सर , रक्ताटे सर, पेदाटे सर , रेपाटे सर , सूर्यवंशी सर , आदी शिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
