
दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी – राजेंद्र पिसे
नातेपुते (ता. माळशिरस) : संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त नातेपुते येथे कर्मयोगी विचार मंच यांच्यावतीने वारकऱ्यांसाठी पोहे व जिलबीचा महाप्रसाद वाटप उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात शेकडो वारकऱ्यांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन अवधुत उराडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी सागर उराडे, सुरज उराडे, दर्शन उराडे, विश्वजित पिसाळ, शिंदे पाहुणे, मयूर पाडसे, विवेक उराडे, विघ्नेश उराडे, अॅड. प्रतीक काळे, निखिल शेंडे, विराज उराडे, अक्षय उराडे, अमित पवार, दाजी, वीरेंद्र उराडे, अक्षय पलंगे, ओंकार उराडे, पार्थ उराडे, सौरभ उराडे, खिलारे, शार्दूल उराडे, चैतन्य उराडे, प्रज्वल उराडे, शुभम उराडे,आकाश शिंदे, पोपट काळे, विठ्ठू पोटे, ऋषी फुले, माऊली माने, शिवम उराडे, राजविर दातीर आणि मित्र परिवार उपस्थित होते.
संतांची पालखी, वारकऱ्यांची सेवा, आणि सामूहिक सहभाग यामुळे उपक्रम अत्यंत भावपूर्ण व यशस्वी ठरला.